zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

दरवर्षी २८ दिवस सार्वजनिक सुट्ट्या, प्रत्येक आठवड्यातील रविवारच्या ५२ सुट्ट्या आणि ४४ दिवस उन्हाळा सुट्टी, अशा एकूण १२४ दिवस शाळा बंद असतात. त्यात सत्र परीक्षांचेही काही दिवस असतात. मात्र, शैक्षणिक वर्षातील ३६५ पैकी किमान २२० दिवस तरी विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, असा निकष आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांसह अन्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा २० ते ३० एप्रिल दरम्यान होतील. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना किमान २२० दिवस अध्यापन व्हावे, हा त्यामागील हेतू आहे.

दरवर्षी २८ दिवस सार्वजनिक सुट्ट्या, प्रत्येक आठवड्यातील रविवारच्या ५२ सुट्ट्या आणि ४४ दिवस उन्हाळा सुट्टी, अशा एकूण १२४ दिवस शाळा बंद असतात. त्यात सत्र परीक्षांचेही काही दिवस असतात. मात्र, शैक्षणिक वर्षातील ३६५ पैकी किमान २२० दिवस तरी विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, असा निकष आहे. तरीपण, दरवर्षी मार्चअखेर अंतिम सत्र परीक्षा घेतली जायची.

परीक्षा झाल्याने एप्रिल महिन्यापासूनच विद्यार्थी शाळेला यायचे बंद व्हायचे. या पार्श्वभूमीवर अंतिम सत्र परीक्षा मागच्या वर्षीपासून एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) घेतला. परीक्षेचा निकाल १ मे रोजी जाहीर होऊन २ मे पासून शाळांना उन्हाळा सुट्टी असेल, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

२६ एप्रिल रोजी शिष्यवृत्ती परीक्षा

चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला (रविवारी) होणार आहे. या परीक्षेसाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातील ४८ हजार ६९१ विद्यार्थी आहेत. त्यात चौथीचे ३१ हजार ४९४ आणि सातवीचे १७ हजार १९७ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चौथीचे २१ हजार २०२ आणि सातवीचे पाच हजार ४६७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देतील. शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी असल्याने अंतिम सत्र परीक्षेचा कोणताही अडथळा नसेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१५ जूनपासून दरवर्षीप्रमाणे सुरु होतील शाळा

शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात होईल. २ मे पासून शाळांना उन्हाळा सुट्ट्या असतील. १५ जूनपासून दरवर्षीप्रमाणे शाळा सुरु होतील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

‘सीबीएसई’चे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून

‘सीबीएसई’ पॅटर्नच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरु होते. त्या शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा मार्चमध्येच घेतली जाते. परीक्षेनंतर १ एप्रिलपासून शाळेला सुरवात होते. त्यानंतर १ मे पासून १४ जूनपर्यंत या शाळांमधील विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT