exam problem 
महाराष्ट्र बातम्या

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेच! कुलगुरु म्हणाले...ऑगस्टपूर्वी होतील परीक्षा; 'हे' आहे कारण

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजयुजीसी) ज्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून राज्य सरकारने निर्णय घ्यावेत, असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यपालांनी 'युजीसी'च्या सूचना व कायद्यातील तरतूदी पाहून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे परीक्षेचा पेच वाढला आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 15 ऑगस्टपर्यंत परीक्षा होतील आणि 15 ऑगस्टला निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होईल, अशी शक्यता काही कुलगुरूंनी व्यक्त केली असून कोरोनाचा संसर्ग कधी कमी होईल हे सांगता येत नसल्याने परीक्षा घ्यायच्या की नाहीत, यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने देशपातळीवर ठोस निर्णय जाहीर करावा. दरम्यान, महाराष्ट्रातील परीक्षेचा निर्णय आठ दिवसांत राज्यपाल घेतील, असेही कुलगुरूंनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्स

राज्यातील चक्रीवादळ, कोरोनाचा वाढणारा संसर्ग आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्माण झालेला पेच यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दुपारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य काही मंत्र्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची वाढलेली चिंता तर चक्रीवादळामुळे बळीराजावर आलेले संकट कसे दूर करता येईल, यासंबंधी चर्चा होईल असे सूत्रांनी सांगितले.


'या' व्हिडिओमुळे परीक्षेची शक्यता बळावली

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांचा एका खाजगी वाहिनीला मुलाखत दिलेला व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट पूर्वी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील, अशी शक्यता वाटते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर राज्यपाल महोदयांनी त्यांना पाठवलेल्या पत्रानुसार अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने सर्व प्रक्रिया थांबली आहे.

- डॉ. उद्धव भोसले, कुलगुरु, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड


विद्यार्थी परीक्षेला येतील का? याचा व्हावा विचार

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. राज्यात दररोज अडीच हजारांपेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अनेक महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल कोविड-19 साठी गुंतल्या आहेत. अशा परस्थितीत परीक्षा घेण्याचा विद्यार्थी केंद्रीत निर्णय घेण्यापूर्वी किती विद्यार्थी परीक्षेसाठी हजर राहतील अथवा किती विद्यार्थ्यांना पालक परीक्षेसाठी पाठवतील, याचाही विचार राज्यपालांनी करावा, असे शिक्षण तज्ज्ञांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला विद्यार्थी हिताचा निर्णय अशा वातावरणात राज्यपालांनी बदलल्यास अथवा परीक्षा रद्द असा निर्णय कायम न ठेवल्यास, त्यांच्याविरुद्ध घरी बसून एक दिवसाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा काही विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे विद्यार्थी बाधित झाल्यास अथवा अनपेक्षित धोका झाल्यास त्याची जबाबदारी राज्यपाल घेणार का, याची लेखी हमी त्यांनी द्यावी, अशीही मागणी या संघटनांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT