Sangali Flood 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पूराचं थैमान! अनेक गावांचा तुटला संपर्क; लोकांचा छतांवर आश्रय

सांगली आणि कोल्हापूरसह कोकणात गाव पाण्याखाली

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळं पूर आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत ११३ लोकांचा मृत्यू झाला असून ४७ जण बेपत्ता आहेत. त्याचबरोबर दोन राष्ट्रीय महामार्गांसह अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, पूरांच्या पाण्यात गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांनी आपल्या घराच्या छतांवर आश्रय घेतल्याचं चित्र आहे.

सांगली जिल्ह्याताली सांगलीवाडी गावाबाहेर रस्त्यावरील गंभीर दृष्ये परिस्थितीवर भाष्य करतात. यामध्ये एका छायाचित्रात एका ट्रकचालकाच्या केबिनपर्यंत पाणी भरल्याचं दिसत आहे. इतर काही छायाचित्रांमध्ये लोक आपल्या घरांच्या छतावर जाऊन बसले आहेत. या ठिकाणी ते अनेक काळापासून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. इथल्या स्थानिक लोकांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की, "मागील पूरासारखी सध्याची परिस्थिती खराब नव्हती पण आम्हाला या गोष्टीची चिंता होती की, थोड्याशा पावसानंतरही पाण्याची पातळी कमी होत नव्हती."

सांगलीतील परिस्थिचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आढावा घेत आहेत. इथल्या मदत कार्याची देखरेख करण्यासाठी ते सांगलीतच आहेत. आजवर सुमारे १ लाख लोकांना आणि ३० जनावरांना इथून सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा आणि सांगली भागाचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी आणि रायगडचा दौरा केला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची नुकसान भरपाई तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार असल्याची घोषणा केली. या भागात मदत कार्यात राष्ट्रीय आणि राज्याचं आपत्ती व्यवस्थापन दल तसेच लष्कराचे जवान, एनडीआरएफच्या मिळून ३४ तुकड्या मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT