महाराष्ट्र

चारा छावणीअभावी शेतकरी हवालदिल

डॉ. संदेश शहा

इंदापूर - शेतकऱ्याचा संसाराचा गाडा हाकणारा शेतीपूरक दूध व्यवसाय दुष्काळामुळे संकटात सापडलेला आहे. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असून, एका जनावरास प्रतिदिन १५० रुपये चाऱ्याचा खर्च होत आहे. त्यामुळे दुष्काळात पशुधन कसे जगवायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यातच तालुक्‍यात अद्याप एकही चारा छावणी सुरू झाली नाही. त्यामुळे मे व जून महिना कसा काढायचा? या कल्पनेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

चालू वर्षी भीषण दुष्काळ पडल्याने नीरा भीमा खोरे, खडकवासला व नीरा डावा कालव्यावर अवलंबून असणारे तालुक्‍यातील बहुतांशी तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच कडब्याचा भाव पंचवीस रुपये प्रती पेंडी झाला आहे. गेल्या वर्षी सातशे ते साडेसातशे रुपयास मिळणारी गहू भुशाची गोणी आता एक हजार रुपये झाली आहे. सोळा रुपये प्रति किलो मिळणारी सरकी पेंड आज सव्वीस रुपये किलोपेक्षा जास्त दराने विकली जाते. 

मका भरडा, गव्हाचा भुसा, सरकी पेंड या सारख्या पशुखाद्यांच्या दरात महागाईमुळे दुप्पट वाढ झाली. एकीकडे शेतीमालास भाव नाही, तर दुसरीकडे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसताना पशुखाद्य दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दूध व दुधभुकटीस सरकारने हमीभाव घोषित करावा, पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात ठेवाव्यात, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी व दूधभुकटी उत्पादक उद्योजकांकडून होत आहे. 

जनावरे पाहुण्यांच्या दावणीला 
पशुखाद्याच्या भाववाढीमुळे दूध व्यवसायाचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. त्यामुळे दुभती जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी पशुधन पाणी असणाऱ्या पाहुण्यांकडे; तर काहींनी भाकड जनावरांना बाजाराचा रस्ता दाखविला आहे. मिळेल त्या भावाने पशुधन विकण्यात येत आहे. 

पशुखाद्य दरवाढीमुळे चालू परिस्थितीत जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. सरकारचे या व्यवसायावर नियंत्रण आहे. ग्राहकांना दुधाचे दर परवडावेत, यासाठी सरकार काळजी घेते. मात्र, जनावरांच्या पशुखाद्याच्या किमती आवाक्‍यात राहण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत नाही. 

दुधाचे पैसे हे चारा, पाणी व खाद्यास पुरत नाहीत. वैरण आणि पशुखाद्य खरेदी करणे शेतकऱ्यांच्या शक्तीपलीकडे गेले आहे. पशुधन कसे सांभाळायचे हाच प्रश्न सतावत आहे. 
- अजित शिंगाडे, पशुपालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT