Manikrao Gavit  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Manikrao Gavit : माजी मंत्री माणिकराव गावित यांचं अल्पशा आजाराने निधन

माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते.

निनाद कुलकर्णी

Manikrao Gavit Passed Away : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये 'दादासाहेब' म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णाल्यात उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली.

माणिकराव गावित सलग ९ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी १९६५ साली ग्रामपंचायतीच्या राजकारणाला सुरुवात केली होती. 1981 साली पहिल्यांदा गावित खासदार झाले होते. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी संभाळली आहे. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते. माणिकराव गावित यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार ,तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT