R. R. Patil's beautiful village 10 lakhs sakal
महाराष्ट्र बातम्या

आर. आर. आबांना मृत्यू आधीच दिसला होता; घरातून बाहेर पडताच...

सकाळ वृत्तसेवा

सांगली: राज्याचे लोकप्रिय नेते, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनाला आठ वर्षे झाली. आबांना आपल्याला झालेल्या आजाराची दाहकता समजली होती. त्यामुळेच उपचार घ्यायला रुग्णालयात दाखल होण्यासाठी अंजनी येथील घरातून शेवटचे बाहेर पडताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. त्यांची कन्या स्मीता यांनी आबा बाहेर पडले त्या घटनेला आज आठ वर्षे होत असल्याची आठवण सोशल मिडियातून जागवाली आहे. काळजाचं पाणी करणाऱ्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. त्या जशाच्या तशा...

कन्या स्मीता यांनी आबा बाहेर पडले त्या घटनेला आज आठ वर्षे होत असल्याची आठवण सोशल मिडियातून जागवाली आहे.

पप्पांचा शेवटचा दिवस ! 

आज 8 नोव्हेंबर ... बरोबर 7 वर्ष झाली . माझ्या वडीलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडीलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते. 3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते . या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. 6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले हेलिकॉप्टर मधुन सगळं गाव दोन - दोनदा फिरून बघितले.

घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे बघुन जात असत.पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधुन वेळ काढून मी व माझी बहिण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूममध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी उभारले होते. 

आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पाना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व प्पपांच्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पांनी आम्हाला शेवटचे खुशीत घेतले असावे व त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती - शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की,स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा ! आता आणख किती सत्कार करणार .. ? मृत्यु पप्पा ना अधीच दिसला होता का ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT