Manikrao Gavit Sakal
महाराष्ट्र बातम्या

सलग 9 वेळा खासदार राहिलेल्या गावितांना खरा न्याय मनमोहन सिंग यांच्या काळात मिळाला

दत्ता लवांडे

नंदुरबारचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे आज निधन झाले. त्यांचे पुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन त्यांच्या निधनाची बातमी दिली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

(Former MP Manikrav Gavit Death)

नंदुरबार जिल्ह्यातील धुडीपाडा येथे माणिकराव गावित यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३४ ला झाला. माणिकराव गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील सलग ३० वर्षे खासदार राहिलेले पहिले नेते आहेत. १९८० च्या लोकसभा निवडणुकीपासून ते २००९ पर्यंत ते नंदुरबारचे खासदार राहिले. सलग ९ वेळा लोकसभेवर निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. तसेच आपल्या पक्षाकडून सलग दहाव्यांदा तिकीट मिळवणाऱ्या जेष्ठ नेत्यांच्या यादीत त्यांचा नंबर लागतो. त्यामुळे त्यांचे काँग्रेस पक्षात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दादासाहेब या नावाने प्रसिद्ध असलेल्या माणिकराव गावित यांना मनमोहन सिंग यांचे सरकार आल्यावर पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं. विशेष म्हणजे आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचं त्यांना टीव्हीवरून कळालं होतं. केंद्रीय मंत्री झाले तरी त्यांची साधी राहणी सामान्य माणसाला भोवणारी होती.

त्यांचे मंत्रिपद गेल्यावर मतदारसंघात एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते एका शासकीय विश्रामगृहात थांबले असताना त्यांची गैरसोय झाली होती. त्यामुळे विश्रामगृहाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्याबरोबर आपले मंत्रिपद गेल्यावरही ते दु:खी नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT