former state election officer Srikant Deshpande says Election Commissions role casts doubt on credibility of elections  
महाराष्ट्र बातम्या

‘आयोगाच्या भूमिकेमुळे निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह’; राज्याच्या माजी निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

"ते पंतप्रधान असले तरी निवडणुकीत ते उमेदवार असतात. आचारसंहितेची अंमलबजावणी सर्वांसाठी सारखी असायला हवी.’’

महिमा ठोंबरे

पुणे, ता. २८ ः ‘‘आचारसंहितेची अंमलबजावणी करताना निवडणूक आयोगाने सर्वांकडे समदृष्टीने पाहायला हवे. तथ्यहीन प्रचार किंवा विशिष्ट समुदायावरील टिप्पणी होत असताना आयोगाने नोटीस द्यायला हवी. पंतप्रधान देखील निवडणुकीत पक्षाचे नेतेच असतात, हे लक्षात घ्यायला हवे. आयोगाच्या संदिग्ध भूमिकेमुळे निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते’’, असे मत राज्याचे माजी निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्याना’त ‘निवडणूक आयोग आरोप-प्रत्यारोप’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे आदी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, ‘‘आचारसंहितेच्या अंमलबजावणीवरून यंदा गदारोळ झाला. आयोगाने एका पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस दिली. पण आचारसंहिता भंग करणाऱ्या वक्तव्यांची प्राथमिक जबाबदारी त्या त्या उमेदवारांची असते. ज्यांनी अशी भाषणे केली आहेत, त्यांना नोटीस न देणे चुकीचे आहे. पंतप्रधानाच्या राजस्थानमधील भाषणांवरून वाद झाले. ते पंतप्रधान असले तरी निवडणुकीत ते उमेदवार असतात. आचारसंहितेची अंमलबजावणी सर्वांसाठी सारखी असायला हवी.’’

ईव्हीएम मशिनवरील वादावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘लोकांना मशीन जर समजत नसेल, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आदेश काही देशांमधील न्यायालयांनी दिला आहे. मात्र मशीन चुकीची आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जे कळेल आणि भावेल, त्या पद्धतीने निवडणुका व्हायला हव्यात. तरच निवडणुकीची विश्वासार्हता वाढू शकेल आणि लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील.’’

‘‘मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी, म्हणून दोन महिने आधीपासून यादीत नाव शोधण्याची प्रक्रिया आयोगाकडून उपलब्ध केली जाते. मतदारांना त्यांचा अनुक्रमांक, मतदार क्रमांक, खोली क्रमांक दिलेली चिठ्ठी आधी दिली जाते. तरीही काही मतदार ऐनवेळी मतदान केंद्रावर येऊन आपल्या नावाची शोधाशोध करतात. त्यामुळे मग मतदान प्रक्रिया संथ होते’’, असेही देशपांडे म्हणाले.

‘मतदारांची उदासिनता चिंताजनक’

श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘‘आपल्याकडे १८ ते २१ या वयोगटातील केवळ २५ टक्के मतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत, ७५ टक्क्यांची मतदारयादीत नावेच नाहीत. तृतीयपंथीयांमध्ये देखील ५० हजार मतदार असताना केवळ पाच हजार मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत. मतदारांची ही उदासिनता चिंताजनक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT