ST Smart Card
ST Smart Card Sakal
महाराष्ट्र

एसटीचे स्मार्ट कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट

सकाळ वृत्तसेवा

एसटी महामंडळाने लाभार्थींकडे स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे.

पुणे - एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार यांच्यासह २९ समाज घटकांना प्रवासी भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. ती मिळवण्यासाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य आहे. हे कार्ड काढण्यासाठी लाभार्थींना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जुलैनंतर सवलतधारक प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड नसले तर त्यांना पूर्ण तिकीट घेणे बंधनकारक राहणार आहे.

एसटी महामंडळाने लाभार्थींकडे स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे; मात्र अनेक आगारात कोरोना व एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे स्मार्ट कार्डची नोंदणीच झालेली नाही. मात्र आता एसटीतर्फे कार्डच्या नावनोंदणीला गती देण्यात आली आहे. खासगी एजंटांना देखील नोंदणीसाठी एसटी आगारात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियेला चालना मिळेल.

स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लाभार्थींकडे शेवटचा एक महिना उरला आहे. यानंतर आता सवलत मिळणार नाही. तसेच, आपल्याकडून ४० टक्के पासून ते शंभर टक्क्यांपर्यंत विविध क्षेत्रांतील व्यक्तींना सवलत देण्यात येते. ज्यांचे स्मार्ट कार्ड बाकी, त्यांनी कार्ड बनवून घ्यावे.

- अनिल भिसे, वरिष्ठ आगारप्रमुख, शिवाजीनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT