Eknath Shinde
Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र

Eknath Shinde:'निमंत्रण सर्व पक्षाला गेलं होतं, पण...जी 20च्या बैठकीला रिकामी खुर्ची दिसताच शिंदे म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

जी 20 परिषदेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये ही बैठक पार पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला संरक्षण मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. यावेळी दिल्लीमध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपल्या देशाला यजमानपद मिळालंय ही अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणाले आहेत, तर याच कार्यक्रमावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

तर पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक बेळगांव सीमा बांधवांबद्दल बोलत आहेत, त्यांनी त्यांचा धाडसीपणा आम्हाला सांगू नये. हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेल मध्ये राहिला आहे. विकासाच्या गप्पा मारणा-यांचे बेगडी प्रेम दिसत आहे. ते आज कार्यक्रमाला आले नाहीत. अजित दादा तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका. आरोपाला उत्तर देण्यासाठी आम्ही रिकामे नाही, आम्ही आमचं उत्तर कामाने देऊ, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

दरम्यान शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बोलताना टोला लगावलाय, ते म्हणाले की, निमंत्रण सर्व पक्षांना गेलं होतं. पण ते आले नाहीत. यातून त्यांचं राज्याच्या तसेच देशाच्या प्रती प्रेम दिसलं. या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचंय असा प्रश्न शिंदे यांनी विचारला आहे? हे बेगडी प्रेम आहे, मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर काही लोक घराबाहेर आले. आता आम्ही समृद्धी मार्गावर गेलो तर काही लोक रस्त्यावर आले असंही शिंदे बोलताना म्हणालेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दिल्लीतील दोन सरकारी हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल; सर्च ऑपरेशन सुरू

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Dr. Shrikant Shinde : भविष्यात देखील आम्ही एकत्र असू ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पुढील युतीचे संकेत

Satara News : वृक्षांची कत्तल झाली, पर्यायी वृक्षलागवड कधी? सातारा जिल्ह्यात महामार्ग बोडकेच

Char Dham Yatra : चार धाम यात्रेला जाताय? तिथल्या या गोष्टींबद्द्ल तुम्हाला ही माहिती असायलाच हवी!

SCROLL FOR NEXT