file photo
file photo 
महाराष्ट्र

गडचिरोली भूसुरुंग स्फोट प्रकरण  : 12 जणांच्या विरोधात आरोपपत्र 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरुंग स्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटकेत असलेले आठ आरोपी व चार संशयित आरोपींच्या विरोधात बुधवारी (ता. 5) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. नक्षलवाद्यांनी दादापूर येथे 1 मे रोजी घडवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात 15 जवान हुतात्मा झाले आणि एका खासगी वाहनचालकाचा मृत्यू झाला.

गडचिरोली भूसुरुंग स्फोट प्रकरणात एनआयएने निर्मला उप्पुगंटी, सत्यनारायणा राणी, दिलीप हिदामी, परसराम तुलावी, सोमसाय मडवी, किरण हिदानी, सुखरू गोटा, कैलास रामचंदानी या अटक झालेल्या आरोपींच्या विरोधात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात मालोजुला वेणुगोपाळ, सतीश मोहाडा, दुर्गेश वट्टी व शिवराम गोटा या संशयित आरोपींचा समावेश आहे.

एनआयएने 25 जूनला गुन्हा दाखल केला होता. 
गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्‍यातील दादापूर (रामगड) येथे सुमारे 150 सशस्त्र नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरली जाणारी 36 वाहने, यंत्रसामग्री आणि कार्यालयांची जाळपोळ केली. त्यानंतर 1 मे रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास शीघ्र कृती दलाचे जवान येरंडी येथील गाहाने याचे खासगी वाहन भाड्याने घेऊन कुरखेडा येथून कोरचीच्या दिशेने निघाले. त्या वेळी कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूळखेडा गावाच्या अलीकडील एका छोट्या पुलावर नक्षलवाद्यांनी शक्तिशाली भूसुरुंगाचा स्फोट घडवला. या स्फोटात वाहनचालकासह 15 जवान हुतात्मा झाले. 

पाऊण तास चकमक सुरू 
या हल्ल्याची माहिती मिळताच कुरखेडा आणि पुराडा पोलिसांची पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचली. परिसरातच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक तब्बल 45 मिनिटे सुरू होती. पोलिसांपुढे टिकाव लागणार नाही, असे लक्षात आल्याने नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT