Gadchiroli  sakal
महाराष्ट्र बातम्या

Gadchiroli : चकमकीत पोलिस जवान ठरले बाजीगर

सतत सुरू असलेली पावसाची रिपरिप, त्यामुळे अधिकच घनगर्द झालेले रान, त्यातील निसरड्या वाटांवरून हातातील बंदूक सावरत कंबरभर पाण्यातून रानातले पाच नाले पार करून पोलिस पुढे जाताच पुढून गोळ्यांचा वर्षाव आणि क्षणात एका पोलिस निरीक्षकासह दोन जवान जायबंदी....नक्षलवादांच्या या अकस्मात हल्ल्याने प्रारंभी बावरलेले जवान सावरले.

मिलिंद उमरे

गडचिरोली : सतत सुरू असलेली पावसाची रिपरिप, त्यामुळे अधिकच घनगर्द झालेले रान, त्यातील निसरड्या वाटांवरून हातातील बंदूक सावरत कंबरभर पाण्यातून रानातले पाच नाले पार करून पोलिस पुढे जाताच पुढून गोळ्यांचा वर्षाव आणि क्षणात एका पोलिस निरीक्षकासह दोन जवान जायबंदी....नक्षलवादांच्या या अकस्मात हल्ल्याने प्रारंभी बावरलेले जवान सावरले. जखमी सहकाऱ्यांना शिताफीने बाहेर काढून तळहातावर प्राण घेऊन लढत खरे बाजीगर ठरले.

ही थरारक घटना बुधवार (ता. १७) छत्तीसगड सीमेवरील वांडोली गावाजवळच्या जंगल परिसरात घडली. येथे तब्बल सहा तास झुंज देत पोलिस जवानांनी १२ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. भर पावसात घनदाट जंगलात जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण.

समोरून गोळ्या आल्यानंतर आणि काही कळण्यापूर्वीच उपनिरीक्षक सतीश पाटील, हवालदार शंकर पोटावी व अंमलदार विवेक शिंगोळे जखमी झाले. पहिल्या फळीतील हे तिघेही जखमी होऊन जमिनीवर पडले आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसला. पण, जवानांनी गोळ्यांच्या वर्षावात हिंमत दाखवत जखमी सहकाऱ्यांना सुरक्षित स्थानी हलवले. तीनही सहकारी धोक्याबाहेर असल्याची खात्री पटताच जवान नक्षलवाद्यांना भिडले. सहा तास चालेल्या या चकमकीत १२ नक्षलींना ठार करूनच पोलिस परतले.

‘साहब, मै नही जाएगा’

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले हवालदार शंकर पोटावी व अन्य दोघांना रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते.पण पोटावी यांनी ही लढाई सोडून जायला नकार दिला. ‘साहब, मै नही जाएगा’ असे म्हणत हाताला बॅंडेज हाताला बांधून बंदूक सावरत ते पुन्हा लढायला सज्ज झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT