rahul jadhav gangster.jpeg 
महाराष्ट्र बातम्या

एकेकाळी मुंबईत 'भिकू' नावाने गँगस्टर होता; आज 'तो' आहे प्रसिद्ध धावपटू!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एक गॅंगस्टर म्हटला तर आपल्या डोक्यात नेहमी बंदूक हातात घेऊन धमकी देणारा डॉनच येतो. अशी अनेक उदाहरणे आहेत की, कारागृहात राहून स्वत;मध्ये बदल निर्माण करणारे अट्टल गुन्हेगारही आपण पाहिले असतील. ज्यांनी आज चांगले व्यक्तीमत्व निर्माण केले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? असा एक गँगस्टर होता. जो आज मॅरेथॉनचा प्रसिध्द धावपटू आहे. कदाचित आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. मनाचा निश्चय पक्का असेल तर माणूस आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल निर्माण करू शकतो. त्याचेच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे राहूल जाधव...

एकेकाळी होता गँगस्टर; आज मॅरेथॉनचा धावपटू 

वर्ष २००७ मध्ये मकोका गुन्ह्यासह डझनभर गुन्हे दाखल असणारे गॅंगस्टर राहुल जाधव.... याच काळात शहीद पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर यांनी राहुल जाधव यांना अटक केली. त्यावेळेस पोलिसांच्या गोळीपासून राहुल जाधव वाचले.. आणि वर्ष २०१० मध्ये राहुल जाधव जामिनावर बाहेर आले. त्यावेळी त्यांनी ३ वर्षे ऑर्थर रोड तुरुंगात काढली. त्यावेळी विविध खटले त्यांच्यावर चालले. पण खरी सुरूवात त्यांची इथून पुढे झाली. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना एका कंपनीत नोकरी मिळाली. पण नशिब पुन्हा फिरलं आणि एक दिवस अचानक पोलिसांनी पत्रकार जेडे हत्या प्रकरणी राहुल जाधव यांच्यासह अनेक नामाकिंत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं.

मनाचा निश्चय पक्का असेल तर काहीही शक्य

पण मनाचा निश्चय पक्का असेल तर माणूस आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल निर्माण करू शकतो. राहुल जाधव यांनी आपला भुतकाळ मागे सारत उंच झेप घेतली आहे. ते आता सध्या मॅरेथॉनचे प्रसिध्द धावपटू आहेत. गेली १९ वर्ष ते सतत धावत आहेत. त्यांच्या आय़ुष्यातील १० वर्षे पोलिसांपासून तर गेली ९ वर्षे ते मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. ४३ वर्षीय राहुल जाधव यांना आता टाटा मुंबई मॅरेथॉनचंही तिकीट मिळालं असून याची जोरदार तयारी सुरू आहे. राहुल जाधव सध्या पुण्यात स्थायिक आहेत. मुंबई मॅरेथॉनचा पास मिळवण्यासाठी ते बीकेसीमध्ये दाखल झाले. २०१६ पासून मुंबई मॅरेथॉनचं हे त्यांचं चौथं वर्ष असल्याचं राहुल यांनी सांगितलं.

सध्या मॅरेथॉन हाच जीवनाचा ध्यास

शालेय जीवनात खेळाची आवड असणारे राहुल मूळचे ठाण्याचे रहिवासी होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच... त्यांच्या परिवारात ते सर्वात मोठे असून त्यांच्यामागे तीन बहिण- भाऊ होते. वडील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते आणि त्यातून जे काही मिळत होतं, त्यात फक्त घर चालायचे. बहिणीच्या लग्नासाठीही पैसे वाचवायचे होते. आणि हीच परिस्थिती त्यांना गुन्हेगारीकडे घेऊन गेली. सध्या मॅरेथॉन हाच जीवनाचा ध्यास बनला असं ते आवर्जून सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT