Abdul Sattar
Abdul Sattar esakal
महाराष्ट्र

Abdul Sattar : ''इतकं मारा की...'', जबाबदार मंत्र्याचं वादग्रस्त विधान; विरोधक आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजी नगरः वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक चुकीचं विधान केलं आहे. सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर लाठीजार्च करण्याचं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. यावेळी त्यांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळे संताप व्यक्त होतोय.

छत्रपती संभाजी नगरमधल्या सिल्लोड येथे बुधवारी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रम सुरु असताना काही तरुणांनी गोंधळ घालून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. तरुणांचा गोंधळ वाढल्यानंतर काहीवेळ कार्यक्रम थांबवावा लागला.

त्यानंतर संतापलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंचावर येत तरुणांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तरीही त्यांचा अतिउत्साह थांबायचं नाव घेत नव्हता. शेवटी सत्तारांनी पोलिसांना आवाहन करत लाठीजार्ज करा असं म्हटलं. हे बोलताना त्यांनी चुकीचा शब्दप्रयोग केला.

अब्दुल सत्तार पोलिसांना सूचना देताना म्हणाले की, यांना कुत्र्यासारखं मारा.. १ हजार पोलिसांना ५० हजार लोकांना मारायला काय लागतं. यांच्या XXX हड्डी तुटली पाहिजे. गोंधळ घालणाऱ्यांना जेलमध्ये टाका, असं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. त्यांनंतर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज केला.

सत्तारांच्या या वागण्यामुळे विरोधी पक्ष संतप्त झाला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्तारांनी सरकारचा खरा चेहरा समोर आणला आहे. महायुती सरकारची हीच संस्कृती आहे. महिलांना शरमेने खाली बघायला लावणारं विधान करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही, सरकारमधील मंत्र्याला अशी भाषा शोभत नाही. असं म्हणत सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT