Girish mahajan eknath khadase  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan : फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती? महाजनांनंतर खडसेंचं मर्मावर बोट

राष्ट्रवादीचे नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद ऐन कडाक्याच्या थंडीत चांगलाच तापला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Girish Mahajan Eknath Khadase Controversy : राष्ट्रवादीचे नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद ऐन कडाक्याच्या थंडीत चांगलेच तापत चालले आहेत. काल खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी खडेसेंच्या मर्मावर बोट ठेवत खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता एकनाथ खडसेंकडून महाजनांच्या फार्म हाऊस प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

महाजनांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता खडेसेंनी महाजन यांची गेस्ट हाऊसवरील भानगड मी पाहिली आहे ? असं म्हंटल्याने खळबळ उडाली आहे. खडसेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. खडसेंनी फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली असल्याचे विधान केले आहे. एवढेच नव्हे त्यावेळी या प्रकरणावर वर्तमानपत्रात छापूनही येत असल्याचे म्हटले आहे.

गिरीश महाजनांचे अनेक प्रेमसंबंध आहे. मात्र, आपण याचा कधी उल्लेख केला नसल्याचे एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असेही खडसेंनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझ्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा असे चॅलेंज खडसेंनी दिले आहे.

महाजनांचे विधान नेमकं काय?

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना मुलगा असता तर तो राजकारणात आला असता आणि सूनही राजकारणात आली असती असं विधान केले होते. मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही, मुली असणं देखील सुदैवच आहे. मी खूप आनंदी आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की, त्यांना एक मुलगा होता त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. मला हा विषय बोलायचं नाहीये पण, ते जर मझ्या मुलाबाळांबद्दल बोलत असतील तर खडसेंना एक मुलगा होता. ३२-३३ व्या वर्षी त्याचं काय झालं? हा संशोधनाचा विषय आहे? हे बोलणं त्यांना झोंबेल, मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं. आत्महत्या झाली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे, असे महाजन म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफटत नेले अन्...

IND vs NZ, 4th ODI: न्यूझीलंड ऑलआऊट, तरी भारतासाठी विजय कठीण! आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं, ते घडवण्याची संधी

'त्या सेटवर नेमकं काय घडलं, मला सगळ्यांनी सांगितलं'; नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

श्रीवर्धनला 'ब्ल्यू फ्लॅग'! सागरी किनाऱ्याला जागतिक स्तरावर नवी ओळख; रोजगाराची संधी

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँक अध्यक्षांची निवड बुधवारी; महेंद्र लाड, विश्वजित कदम, देवराज पाटील शर्यतीत

SCROLL FOR NEXT