महाराष्ट्र

आम्हाला एक मंत्रिपद द्या : आठवले

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुख्यमंत्री साहेब, आम्हाला एक मंत्रिपद देऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्यावा. सत्तेचा कार्यकाळ संपायला दहा महिने राहिल्याने, रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आठवलेंनी नाराजी व्यक्त केली. 

'तुमचा निर्णय होत नसेल तर आम्हाला एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन आता पूर्ण करा', असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे आठवलेंनी आज जाहीर केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महायुती झाल्यास आरपीआयला दोन आणि शिवसेना युतीत नसेल तर चार जागा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 

दलित समाजाची लोकसंख्या वाढल्याने अडीच टक्के आमचं आणि ओबीसीचं ही दहा टक्के आरक्षण वाढवण्याची मागणी करणार असल्याचेही आठवले म्हणाले.

तसेच देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात सरकारविरोधात बोलू पाहणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं हे अयोग्य असल्याचं आणि चंद्रशेखर आझाद यांना भाषण करू न देण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचं म्हणत आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT