Gokul Milk Rate
Gokul Milk Rate Esakal
महाराष्ट्र

Gokul Milk Rate : गोकुळचे दूध पुन्हा महागले, गायीच्या दुधात 3 रुपयांची वाढ

सकाळ डिजिटल टीम

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंतेत आणखी भर टाकणारी बातमी आहे. पेट्रोल-डिझेल, सीएनजी गॅस आणि घरगुती गॅस दरवाढीनंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर 3 रुपये इतकी वाढ केली आहे. गोकुळ दूध वितरण संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

गोकुळने ही दरवाढ मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये केली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळ दूध वितरण संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात आतापर्यंत तीन महिन्यात दुसऱ्यांदा ही दरवाढ केली आहे.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

गोकुळने गायीच्या दूधामध्ये लिटरमागे 3 रुपयांची तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, आजच्या दरवाढीमुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे. गोकुळ ब्रँडच्या फुल क्रिम दुधाच्या ग्राहक दरात बदल करण्यात आलेला नाही. .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT