महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! आचारसंहितेआधी मिळणार नुकसान भरपाई

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मेळघाटातील काही शेतकऱ्यांना बसलेल्या पुराच्या फटक्‍यानंतर पंचनाम्यांचे काम संपले आहे. आचारसंहितेमुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राज्य भरातील सर्व पुरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अदा केली जाईल अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

कोकण विभागातील पुरग्रस्त शेतकऱ्यांची व फळोत्पादनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोंडे यांनी पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणातील पुरपरिस्थितीबाबत सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली.

पर्यावरणाच्या बदलत्या हंगामाचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ज्याठिकाणी पुरपरिस्थिती आहे अशा जिल्ह्यात दुसरीकडे दुष्काळ परिस्थिती असल्याचे चित्रही आपण पाहिल्याने शेतीउत्पदानाची बिकट परिस्थिती असल्याचे सूचक वक्तव्य बोंडे यांनी केले.

पुरामुळे कोकणातील 46 हजार 642 हेक्‍टर शेतजमिनीला फटका बसला आहे. आत्तापर्यंत कोकणातील 65 हजार 452 शेतकऱ्यांच्या जमिनींचे पंचनामे कमी वेळेत करण्यास प्रशासनाला यश आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक व मेळघाटासहीत राज्यातील सर्व शेतीला बसलेल्या पुराच्या पाण्याचा आढावा घेतल्यास तब्बल साडे पाच लाख हेक्‍टर जमिनीला पुराचा परीणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणातील शेत जमिनींचा आकार कमी असल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मदतीची रक्कम चांगली पोहोचावी याकरीता जमिनीच्या तिन पट जास्त रक्कम मदत म्हणून देण्याचा सकारात्मक विचार सरकारने केला आहे. अशी माहिती बोंडे यांनी दिली. 


भात व चिकूवर परीणाम 
कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीला जोरदार फटका बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे भातशेतातील पीके वाहून गेली. भातशेती उत्पादत शेतकऱ्याला भरीव मदत व्हावी याकरीता कोरडवाहू शेतजमिनीचे नियम न लावता बागायती शेतीचे नियम लावण्याची विनंती सरकारला केली आहे. चिकू पीकावर आता आळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. आळीपासून चिकूचे संरक्षण व्हावे याकरीता विशेष योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. त्यामुळे कोकणातील पिका विमा कंपन्यांना जोखीम स्तर वाढवण्याच्या सूचना केल्या असल्याचे बोंडेंनी सांगितले. 

फक्त शेती व आलेली पीके वाया गेलीत म्हणून शेतकऱ्यांना मदत केली जाणार नसून कोकणासहीत राज्य भरातील शेतकऱ्यांना पुन्हा भक्कम उभे करण्यासाठी सरकारतर्फे भरीव मदत केली जाणार आहे.- डॉ. अनिल बोंडे, कृषी मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

IPL 2026: 'विराट-रोहितला जसा पर्याय नाही, तसाच संजू सॅमसनलाही...'; राजस्थान रॉयल्सच्या ट्रेडवर काय म्हणाला नवा कर्णधार?

SCROLL FOR NEXT