शेतकऱ्यांसाठी पीकविम्याचे ७१ कोटी sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! सोलापूर जिल्ह्यातील ६५,६२० शेतकऱ्यांना आज मिळणार पीकविम्याचे ९० कोटी; नुकसान भरपाईची रक्कम बॅंकांनी कर्जात वर्ग करू नये, वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील २०२४ या वर्षातील खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ४८ हजार ९३९ असून त्यांना पीकविम्याचे ७१ कोटी चार लाख रुपये आणि रब्बी हंगामातील १६ हजार ६८१ शेतकऱ्यांना १८ कोटी ८१ लाख रुपये मिळणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ६२० शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचा विमा मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उद्या (सोमवारी) ८९ कोटी ८५ लाखांची भरपाई वितरित होणार आहे. राजस्थानमधील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वग केली जाणार आहे.

राज्य सरकारकडे पीकविम्याचा विमा कंपनीला द्यायचा हिस्सा प्रलंबित होता. त्यामुळे २०२२ पासून बाधित शेतकऱ्यांना पीकविम्यातून भरपाई मिळालेली नव्हती. आता जुलैअखेर राज्य सरकारने विमा कंपनीला एक हजार २४ कोटी रुपये दिल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे. त्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राजस्थानमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला असून तेथून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील २०२४ या वर्षातील खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ४८ हजार ९३९ असून त्यांना पीकविम्याचे ७१ कोटी चार लाख रुपये आणि रब्बी हंगामातील १६ हजार ६८१ शेतकऱ्यांना १८ कोटी ८१ लाख रुपये मिळणार आहेत. पण, एक हजार रुपयांपेक्षा कमी पीकविमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे काही दिवसांनी भरपाईची रक्कम मिळेल. एक हजार रुपयाला कमी असलेली रक्कम राज्य सरकार त्यात घालून ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

‘डीबीटी’द्वारे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार भरपाई

२०२४ या वर्षातील रब्बी व खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या जिल्ह्यातील ६५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना उद्या (सोमवारी) पिकांची भरपाई मिळणार आहे. ‘डीबीटी’द्वारे ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार आहे.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

भरपाईची रक्कम बॅंकांनी कर्जात वर्ग करू नये

अतिवृष्टी, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची पीकविम्याची भरपाई सोमवारी (ता. ११) वितरित होणार आहे. आपत्तीत सरकारकडून बाधित शेतकऱ्यांना मिळणारी मदतीची रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT