महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल १७०० ते ३५०० रुपयांचा दर; कांद्याला बांग्लादेश, श्रीलंकेत मोठी मागणी, वाचा...

पक्व आणि पूर्णपणे सुकलेल्या कांद्यालाच चांगले मार्केट आहे. अर्धपक्व तथा ओला कांदा वाळलेल्या चांगल्या कांद्याच्या निम्म्या किंमतीने विकला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला या तालुक्यातून कांद्याची सर्वाधिक आवक आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर, बीडसह कर्नाटकातूनही सोलापुरात कांदा विक्रीसाठी येत आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याला साडेतीन हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. बाजारात २६१ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. सरासरी भाव प्रतिक्विंटल १७०० रुपये होता.

अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १४ हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. पावसाळ्यात काही दिवस शेतातून पाणी वाहिल्याने कांदा जागेवरच खराब झाला. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीत येणारा कांदा ६० टक्के खराबच होता. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळत होता. सरासरी भाव ७०० रुपयांपर्यंत होता, पण आता दोन दिवसांपासून १६०० ते १७०० रुपयांचा भाव स्थिर आहे. दरम्यान, निर्यातीच्या निर्बंधामुळे दोन वर्षापासून कांद्याच्या भावात अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

भाववाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जपून ठेवला. पण, अपेक्षित भाव मिळाला नाही. खरीप कांद्याच्या काढणी हंगामाला सुरुवात झाल्यानंतरही सुरुवातीला चांगला दर मिळाला नाही. मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात काहीअंशी सुधारणा झाली आहे. सोमवारी पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील हरिभाऊ शिरसाट यांच्या कांद्याला साडेतीन हजारांचा उच्चांकी दर मिळाला. त्यांच्या ३५ क्विंटलपैकी दहा क्विंटल कांदा त्या भावाने विकला गेला.

पूर्णपणे वाळलेल्या कांद्याला चांगला भाव

पक्व आणि पूर्णपणे सुकलेल्या कांद्यालाच चांगले मार्केट आहे. अर्धपक्व तथा ओला कांदा वाळलेल्या चांगल्या कांद्याच्या निम्म्या किंमतीने विकला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला या तालुक्यातून कांद्याची सर्वाधिक आवक आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर, बीडसह कर्नाटकातूनही सोलापुरात कांदा विक्रीसाठी येत आहे.

बांग्लादेशात कांद्याला मोठी मागणी

सोलापूर बाजार समितीत कांदा खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगण या राज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. येथील कांद्याला बांग्लादेश, श्रीलंकेत मोठी मागणी आहे. निर्यातीवरील काहीअंशी निर्बंध शिथिल झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. फेब्रुवारीपर्यंत कांद्याचे सध्याच्या तुलनेत भाव वाढलेलेच असतील, असेही ते म्हणाले.

दोन दिवसातील कांद्याची आवक

  • एकूण गाड्या

  • ४८२

  • एकूण क्विंटल

  • ४८,२७०

  • किमान-कमाल भाव

  • १७०० ते ३५०० रुपये

  • दोन दिवसातील उलाढाल

  • ७९.८४ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT