महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज; यंदा १४ हजार २३० मुलांना पॉलिटेक्निकला प्रवेश; राज्यात ५६ महाविद्यालयात प्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर: दहावीचा निकाल लागताच सर्वत्र प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. पॉलिटेक्निकची देखील प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. दहावीच्या निकाल लागला आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी यंदा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील एकूण ५६ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूण १४ हजार २३० जागांवर मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.

दहावीनंतर अनेक विद्यार्थी आयटीआय आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यावर भर देतात. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी करत काही विद्यार्थी पुढील शिक्षण पूर्ण करत असतात. त्यामुळे एकंदरीतच विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कल पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक असतो.

त्यातल्या त्यात दहावीचा निकाल लागताच महाविद्यालये देखील प्रवेशासाठी नियोजन करतात. यावर्षी देखील नियोजन करण्यात आले असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी अशा आठ जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयात प्रवेशासाठी लगबग सुरू असून तब्बल १४ हजार २३० जागा भरण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ३ हजार ५५५ जागा भरणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. महाविद्यालयांच्या वतीने देखील नियोजन केले जात असून तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात १२ महाविद्यालयात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार आहे. यावर्षी एकूण ३ हजार ५५५ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.

५६ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश

जिल्हा महाविद्यालये प्रवेशाच्या जागा

छत्रपती संभाजीनगर १२ ३५५५

बीड १० २४७५

हिंगोली २ ३९०

नांदेड ७ २११०

जालना ५ १२००

लातूर १३ ३०२०

धाराशिव ४ ८८०

परभणी ३ ६००

एकूण ५६ १४२३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT