A good response to the Galyukt Shivar in the state
A good response to the Galyukt Shivar in the state 
महाराष्ट्र

'गाळयुक्त शिवार'ला राज्यात चांगला प्रतिसाद

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : राज्यात लोकसहभागातून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या वर्षभरात 1 हजार 963 धरणातील 1.4 घन मीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे 50 हजार शेतकऱ्यांच्या शेतात मोफत गाळाचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी दिली. 

लोकसहभागाने धरणातील गाळ काढण्यासाठी मे 2017 मध्ये प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. येत्या 31 मे पर्यंत सुमारे दोन हजार धरणांमधून गाळ काढला जाणार असल्याचे सांगून चहल म्हणाले, की राज्यातील धरणांमधून गाळ काढून धरणांची पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि पर्यायाने त्याभागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे.

त्याचबरोबर हा धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक उपजाऊ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या कामाच्या यशस्वीतेत शेतकऱ्यांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सिंहाचा वाटा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT