देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस e sakal
महाराष्ट्र

कार्यकर्त्यांना नेते बनवण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केले : देवेंद्र फडणवीस

गणेश पिटेकर

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आश्वासकता होती. त्यामुळे लोक आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जात. सत्तेत नसतानाही गोपीनाथ मुंडे यांना मान होता.

औरंगाबाद : कार्यकर्त्यांना नेते बनवण्याचे काम गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी केले, अशी भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केली. आज गुरुवारी (ता.तीन) गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय टपाल विभागाकडून (Indian Postal Department) मुंडे यांच्या स्मरणार्थ विशेष लिफाफ्याचे विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. श्री.फडणवीस म्हणाले, की राजकारणाचे गुन्हेगारीकरण संपावे, त्यासाठी मुंडे यांनी यात्रा काढली. गुन्हेगारीकरण संपवण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आश्वासकता होती. त्यामुळे लोक आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जात. सत्तेत नसतानाही गोपीनाथ मुंडे यांना मान होता. तसेच त्यांचे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते व त्यांना मानणारे लोक होते. जेव्हा विधानसभेत गोपीनाथ मुंडे विधानसभेत उभे राहत होते. त्यावेळी वातावरण शांत होत होते. त्यांच्यात हजेरी जबाबी होती, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली. त्यांच्यामुळे संसदीय राजकारण शिकलो. मोदींनी (PM Narendra Modi) मुंडे यांच्या आवडीनुसार मंत्रालय दिले होते. त्यांना वेळ मिळाला असता तर त्यांनी ग्रामविकासाचे नवीन चप्टर लिहिण्याचे काम केले असते. मुंडे साहेब नाहीत, तर पुढे कसे जायचे, असा प्रश्न पडला होता. त्यांचे कार्य आम्ही पुढे चालू ठेवले आहे. ओबीसी (OBC) समाजामागे मुंडे उभे होते. मुंडेंनी जो संघर्ष शिकवला तो आम्ही चालू ठेवला आहे. (Gopinath Munde Made Political Activists As Leader, Said Devendra Fadanvis)

संघर्ष यात्रेमुळे सत्ता आली

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, की गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेमुळे सत्ता आली. भापजला हवे होते त्यावेळीच ते निघून गेल्याची खंत, पाटील यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT