Bhagat Singh Koshyari Tested Covid Positive sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरगाव येथील या हॉस्पिटलमध्ये काही वेळापूर्वी त्यांना आणण्यात आलं आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळालेली नाही, अशी माहिती मिळत आहे. (Bhagat Singh Koshyari Tested Covid Positive)

विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी तब्येत कालपासून खराब झाली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांना ताप होता. त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली असता आता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तात्काळ त्यांना रिलायन्स हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांचीही साथ एकनाथ शिंदे यांना लाभली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी या बंडखोर गटाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे हे नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपला समर्थन देत असल्याचं पत्र देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयात दाखल केल्यामुळं आता ही प्रक्रिया अजून दोन ते तीन दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT