Bhagatsingh Koshyari with Model Maera Mishra Sakal
महाराष्ट्र बातम्या

BhagatSingh Koshyari : राज्यपाल पुन्हा अडचणीत? मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल

राज्यपाल कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद ओढवून घेतायत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरुन ते वाद ओढवून घेत आहेत. आता पुन्हा एकदा कोश्यारी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण ठरली आहे एक मॉडेल.

या मॉ़डेलचे राजभवनातले फोटो समोर आले असून त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.

मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, "ठिकाण राजभवन - ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?" या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT