Satyajeet Tambe esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe: 'जीत सत्याची'...निकालाआधीच विजयाचे झळकले पोस्टर्स

नाशिक पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स पुण्यात झळकले आहेत. ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. (graduate constituency election satyajeet tambe wining posters viral)

'जीत' सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात लागले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. असे पोस्टर्स नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी लावले आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कॉंग्रेसची बंडखोरी करत सत्यजीत तांबे जिंकणार की ठाकरेंचा पाठिंबा मिळवणाऱ्या शुभांगी पाटील बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नगरची जागा ही मविआबरोबरच भाजपसाठीसुद्धा प्रतिष्ठेची बनली आहे. कारण भाजपनं सत्यजित तांबे यांना पक्षाच्या पातळीवरुन अधिकृत पाठिंबा दिला नसला, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना मतदानाचं आवाहन केलं गेलं आहे. त्यामुळे या जागेचा निकाल सत्यजित तांबेंच्या पुढची राजकीय वाटचाल ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT