Grampanchayat election progara declare 
महाराष्ट्र बातम्या

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला; २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ

अशोक मुरुमकर

अहमदनगर : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून १८ जानेवारी २०२१ ला मतमोजणी होणार असल्याचे आदेश म्हटले आहे.

राज्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. आता निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सुमारे 14  हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १५ डिसेंबरला तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस जाहीर केली जाणार आहे. तर 23 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबरला दाखल अर्जाची छाननी होणार आहे. तर ४ जानेवारी 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी 20२१ ला मतदान होणार असून 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT