Ramdas Athwale
Ramdas Athwale 
महाराष्ट्र

मणिशंकरांच्या टीकेचा भाजपला चांगलाच फायदा: आठवले

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या टीकेचा चांगला फायदा भाजपला झाला, असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून, तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्येही भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली आहे. तेथेही भाजपला स्पष्ट बहुमत दिसते आहे. 

याविषयी बोलताना आठवले म्हणाले, की 2019 मध्ये सगळे पक्ष एकत्र आले तरी भाजपचेच सरकार येईल. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मोठे आहे. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर काँग्रेसला फायदा झाल्याचे दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT