Gulabrao Patil on Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

आमचं बंड नव्हे, 'उठाव'; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केलं. आज नव्या सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे नव्या सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे. नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर एकनाथ शिंदे गटाकडून माजीमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण केलं.यावेळी त्यांनी चौफेर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये झालेली कुचंबणा मांडली. त्याचवेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला. (Gulabrao Patil Speech in Vidhansabha)

गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही बंड केलेला नाही, उठाव केला आहे. आम्हाला बंडखोर म्हणून नका. आज माझ्या सारख्या माणसाला म्हणतात गुलाबराव तुम्हाला टपरीवर पाठवीन, रिक्षा चालवणारा, चहा विकणारा ज्यांना काही काम नव्हतं त्यांना नेता केलं असू म्हणत आमची खिल्ली उडवली. (Gulabrao Patil on Uddhav Thackeray)

अजितदादा म्हणतात, शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही. पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं सल्ला गलाबराव पाटील यांनी दिला. तसेच आमचा साधा मेंबर फुटला तरी आम्ही विचार करतो. इथं चाळीस आमदार फुटले तरी जाग आली नाही. आम्हाला साहेबांची भेट मिळत नव्हती, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

आधीच्या सरकारमध्ये आम्हाला उद्धव ठाकरे यांची भेट मिळत नव्हती. आमचे फोन घेतले जात नव्हते. त्याचवेळी एकनाथ शिंदे विचारायचे कोरोना काळात तुम्हाला किट वाटप करायच का, काय मदत हवी, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख केला. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात किती दौरे केले, हे तपासा असंही पाटील म्हणाले. शिवसेनेतून नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा मातोश्रीवर या सांगायला हवं होतं. मात्र निवडून येण्याची लायकी नसणारे आम्हाला बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT