Warning of Muslim Party's lawyers after the decision on Gyanvapi Mosque Sakal
महाराष्ट्र बातम्या

Gyanvapi Mosque: 'आम्ही आता हायकोर्टातच आव्हान देऊ', ज्ञानव्यापीवरील निर्णयानंतर मुस्लीम पक्षाच्या वकिलांचा इशारा

Warning of Muslim Party's lawyers after the decision on Gyanvapi Mosque; १९९३च्या आधी ज्ञानव्यापीत पूजापाठ किंवा प्रार्थनेचे पुरावे नाहीत, मुस्लीम पक्षाच्या वकिलाचा दावा.

Manoj Bhalerao

Gyanvyapi Mosque Complex Decision: नुकताच वाराणसी कोर्टाने ज्ञानव्यापी मशीद परिसराबाबत महत्वाचा निर्णय दिला होता. ज्यामुळे हिंदू पक्षाला दिलासा मिळाला होता. बुधवारी (दि.३१ जानेवारी)वाराणसी कोर्टाने ज्ञानव्यापी परिसरातील 'व्यास का तैखाना'या भागात भक्तांना पूजा करण्याची परवानगी दिली होती.

कोर्टाच्या या निर्णयानंतर मुस्लीम पक्षांकडून निर्णयाबाबत नाराजी दर्शवण्यात आली. त्यानंतर मुस्लीम पक्षाचे वकील अख्लाक अहमद यांनी अलाहबाद हायकोर्टाचं दार ठोठावण्याचा इशारा दिला.

वाराणसी कोर्टाच्या निर्णयाबाबत नाराजी दर्शवताना अख्लाख अहमद म्हणाले की, "या निर्णयाविरोधात आम्ही अलाहबाद हायकोर्टात जाऊ. या आदेशात 2022 चा ॲडव्होकेट कमिशनरचा अहवाल, पुरातत्व विभागाचा अहवाल (ASI Report) आणि 1937 च्या निर्णयाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, जो आमच्या बाजूने होता. हिंदू पक्षाने 1993 पूर्वी पूजापाठ किंवा प्रार्थना केल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. या ठिकाणी अशी कोणतीही मूर्ती नाही."

वकील मिराजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की ते या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागतील. सिद्दीकी म्हणाले की, "मी या निर्णयाचा स्वीकार करणार नाही. जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष दोघेही मिळूनजुळून काम करत आहेत. आम्ही कायदेशीर लढा देऊ. राजकीय फायदा मिळवण्यासाठी हे होत आहे. बाबरी मशीद प्रकरणातही तोच मार्ग अवलंबला जात आहे. आयुक्तांचा अहवाल आणि एएसआयचा अहवाल आधी सांगतो की आत काहीही नाही. आम्ही या निर्णयावर खूप नाराज आहोत." ते पुढे म्हणाले की 1993 पूर्वी प्रार्थना झाल्याचा कोणताही पुरावा नाही.

वाराणसी न्यायालयाने बुधवारी हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशीद संकुलातील 'व्यास का तैखाना' परिसरात पूजा करण्याची परवानगी दिली होती. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला येत्या सात दिवसांत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेशही दिल आहेत. (Latest Marathi News)

हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी एएनआयला सांगितले की, "सात दिवसांत पूजा सुरू होईल. प्रत्येकाला पूजा करण्याचा अधिकार असेल." मशिदीच्या तळघरात चार तळघर आहेत, त्यापैकी एक आजही व्यास कुटुंबाच्या ताब्यात आहे, जे तेथे राहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT