solapur excise action

 

solapur

महाराष्ट्र बातम्या

सरकारी जमिनींवर हातभट्ट्या! जागा मालक सापडू नये म्हणून हातभट्टी चालकांची शक्कल; सोलापूर जिल्ह्यात ३ वर्षांत २८ कोटींची हातभट्टी नष्ट, वाचा...

हातभट्ट्यांसाठी शासकीय जागांवरील झाडांची कत्तल सुरु आहे. दुसरीकडे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यावसायिकांचा हा काळा चेहरा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे. १४ महिन्यांत उद्ध्वस्त केलेल्या ३,६१७ हातभट्ट्यांपैकी ७० टक्के हातभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात लाकडे आढळली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : हातभट्ट्यांसाठी शासकीय जागांवरील झाडांची कत्तल सुरु आहे. दुसरीकडे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यावसायिकांचा हा काळा चेहरा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे. १४ महिन्यांत उद्ध्वस्त केलेल्या ३,६१७ हातभट्ट्यांपैकी ७० टक्के हातभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात लाकडे आढळली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशी-विदेशी दारूचे दर दुप्पट-अडीचपट वाढल्यानंतर मद्यपी स्वस्तातील हातभट्टीच्या दारूकडे वळले आहेत. गावागावांत हातभट्टीची विक्री उघडपणे होत असून, दारूच्या नशेतून होणारे कौटुंबिक वादही वाढत आहेत. सरपंच, पोलिस पाटील वाद मिटवितात; मात्र हातभट्टी विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी कोणीही पुढे येत नाही. या मौनाचा फायदा घेत हातभट्टी व्यावसायिकांनी खासगी जमिनी, सामाईक बांध, सामाजिक वनीकरण, वन विभाग तसेच ओढे-नाल्यांच्या काठांवर अड्डे उभारले आहेत.

अनेक ठिकाणी दिवस-रात्र भट्ट्या धगधगत असतात, पण स्थानिकांकडून याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. हातभट्ट्यांसाठी लागणाऱ्या इंधनापोटी बाभूळ, लिंब, चिंच, बोरी, अशा झाडांची कत्तल केली जात आहे. काही ठिकाणी वीजचोरीतून हा अवैध व्यवसाय सुरु आहे.

वर्षनिहाय कारवाया अन्‌ जप्त मुद्देमाल

  • सन एकूण कारवाया मुद्देमाल

  • २०२३-२४ २०६७ ६ कोटी

  • २०२४-२५ २६०३ ८.५६ कोटी

  • २०२५-२६ ३०५७ १२.५६ कोटी

  • २०२६-२७ ५६० १.९८ कोटी

सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा होईल हातभट्टीमुक्त

हातभट्ट्यांवरील कारवाईवेळी ७० टक्के हातभट्ट्या लाकडांवर पेटविल्याचे, तर २५ ते ३० टक्के भट्ट्यांसाठी अनधिकृत वीज कनेक्शन घेतल्याचे आढळते. जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्या समूळ नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नेहमीच कारवाया सुरु आहेत. परंतु, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून आम्हाला माहिती दिल्यास निश्चितपणे चित्र बदलेल. बहुतेक हातभट्ट्या खासगी जमिनीवर आढळतात, पण त्या सामाईक बांधावर असतात. त्या जागेचा मूळ मालक समजू नये, हा त्यामागील हेतू असतो. पण, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटलांनी मदत केल्यास असेही प्रकार थांबतील.

- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

हातभट्टीत फटाक्यांची दारू अन्‌ घड्याळाच्या सीलची पावडर

हातभट्टीसाठी काळा गूळ, अस्वच्छ पाणी आणि नवसागर पावडर हे घटक वापरले जातात. पण, दारू पिणाऱ्याला अधिक ‘किक’ बसावी म्हणून काही अवैध व्यावसायिक त्यात फटाक्यांची दारू, घड्याळाच्या सीलमधील रासायनिक पावडर मिसळतात. हे मिश्रण मोठ्या ड्रममध्ये भरून सलग चार-पाच तास तापवले जाते. त्यातून तयार होणारी दारू अधिक नशा देत असल्याचा दावा केला जातो. मात्र, याच दारूने डोळ्यांवर परिणाम, यकृत व मूत्रपिंडांचे विकार, गंभीर विषबाधा होऊन अनेकांचा जीव गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT