hasan mushrif sakal
महाराष्ट्र बातम्या

'एमआयएम'ला आत्ताच कशी जाग आली? हसन मुश्रीफांचा टोला

आजपर्यंत आम्ही कधीच एमआयएमचा पाठिंबा घेतला नाही-हसन मुश्रीफ

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार तीन चाकी आहे. त्यांनी आमचा पाठिंबा घेऊन चार चाकी गाडी करावी, अशी हाक राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घातली आहे. त्यांच्या या विधानावर हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) सडेतोड उत्तर दिले आहे. एमआयएम पक्षाला आताच साक्षात्कार का? यामागे नक्कीच काहीतरी कारस्थान आहे. याचा आता अभ्यास करावा लागेल असा थेट इशारा मुश्रीफांनी दिला आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटीलही (Satej Patil) उपस्थित होते.

एमआयएम पक्षाला आताच साक्षात्कार का? यामागे नक्कीच काहीतरी कारस्थान आहे. याचा आता अभ्यास करावा लागेल

आजपर्यंत आम्ही कधीच एमआयएमचा पाठिंबा घेतला नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा घेण्याचा निर्णय आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असेही मुश्रीफ म्हणाले.खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, राजू शेट्टी यांच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत. त्यातील नियमित पिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय अर्थसंकल्प घेतला आहे. तर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत शासनाने समिती नेमली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल आहेत. याविषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरमधून पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार असेल, असे जाहीर केले आहे. त्यांच्या शब्दासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांना काम करावे लागेल. भाजपला रोखण्यासाठी एकत्रित राहणे गरजेचे आहे. यापूर्वी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, राजेश क्षीरसागर यांच्यात बैठक झाली आहे. मुख्यमंत्री देतील तो आदेश पाळण्याचे ठरले होते असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT