Heat wave decreased in pune and Rain forecast in state
Heat wave decreased in pune and Rain forecast in state 
महाराष्ट्र

पुण्यात उष्म्याचा चटका झाला कमी;राज्यात पावसाचे सावट

सकाळवृत्तसेवा

पुणे : अगदी बुधवारपर्यंत उन्हाच्या चटक्याने भाजून निघणारे पुणेकर ढगाळ वातावरणामुळे गुरुवारी काहीसे सुखावले. बुधवारी ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा अवघ्या चोवीस तासांमध्ये ५.३ अंश सेल्सिअसने कमी होऊन ३४.२ अंश सेल्सिअस नोंदला. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झाले नव्हते. दुपारनंतर काही अंशी उन्हाची किरणे पडली. त्यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने कमी झाले. मात्र, किमान तापमान २०.१ (१.४ अंश सेल्सिअसने जास्त) नोंदण्यात आल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

होळीनंतर शहरात उन्हाचा चटका वाढत होता. सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यात नोंदले जात होते. याच दरम्यान गुरुवारी ढगाळ वातावरणा झाल्याने उन्हाचा चटका कमी झाला. तापमान पाच अंशांनी घसरले हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार लगतचा भाग ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम झाला असून, पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पावसाचे सावट
राज्यात काही भागांत ढगाळ वातावरण झाले. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शुक्रवारपासून (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशाराही दिला आहे.

का झाले ढगाळ वातावरण?
- गुरुवारी उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि परिसर बिहार ते पूर्व विदर्भ पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे
- कोमोरिनचा भाग आणि परिसर ते उत्तर कर्नाटक या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे
- दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर सुमात्रा किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होत आहे
- झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तर भाग व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ते १.५ किलोमीटरच्या दरम्यान आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहे

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT