Heave wave will increasing in maharashtra
Heave wave will increasing in maharashtra 
महाराष्ट्र

राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात होळीनंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. एप्रिल आणि मेमध्ये या चटक्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला जाईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत २०१६ पासून उन्हाळा आणि हिवाळा हंगामात उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर केला जातो. ‘मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम’ प्रारूपाच्या आधारे हवामान विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील तापमानाचा अंदाज वर्तविला आहे.या जाहीर केलेल्या अंदाजानुसार उन्हाळ्यात उत्तर, वायव्य आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार आहेत. तसेच पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगडसह पश्चिम किनाऱ्यावरील कोकण, गोव्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उन्हाचा चटका वाढणार असला तरीही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पारा सरासरीइतका किंवा त्यापेक्षा कमी नोंदला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.हवामान विभागाच्या या अंदाजानुसार उत्तर, वायव्य, ईशान्य भारतातील सर्वच विभागांसह, पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात, सौराष्ट्र, कोकण-गोवा या विभागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतासह लगतच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या मध्य भारतातील विभागात दिवसा कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा - पुणे विद्यापीठातील विशेष प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करा; कुलगुरूंकडे मागणी

एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीतील किमान तापमानाचा विचार करता, हिमालय पर्वताचा पायथ्यासह उत्तर भारत, वायव्य भारत, मध्य भारताचा पश्चिम भाग (कोकण-गोवा), दक्षिण भारताच्या किनारपट्टीय भागात किमान तापमान सरासरीच्यावर राहणार आहे. तर पूर्व, मध्य भारतातील बहुतांशी विभागांसह, जम्मू-काश्मीर राज्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

प्रशांत महासागरात ला-निना स्थिती
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असून, या भागात सध्या मध्यम ला-निना स्थिती आहे. उन्हाळ्यातही या भागात ला-निना स्थिती टिकून राहण्याचे संकेत आहे. मात्र येत्या काळात या भागातील तापमानात वाढ झाल्यास त्याचे परिणाम देशातील व राज्यातील तापमानावर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT