Raj Thackeray
Raj Thackeray 
महाराष्ट्र

राज ठाकरे यांची आज चौकशी; शांतता राखण्याचे पुन्हा आवाहन 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवारी) "ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर "ईडी' कार्यालय आणि मुंबईत मनसेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमण्याच्या शक्‍यतेने राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा शांततेचे आवाहन केले आहे. 

कोहिनूर मिलप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी "ईडी'ने चौकशी केली. तसेच, त्यांच्या कंपनीतील भागीदार राजन शिरोडकर यांचीही चौकशी करण्यात आली. राज ठाकरे यांना चौकशीसाठी उद्या बोलविण्यात आले आहे. राज यांना "ईडी'ने नोटीस पाठविल्यापासून मनसेतील वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपासूनच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्यास सुरवात केल्यामुळे राज यांनी काल शांततेचे आवाहन केले होते. 

राज यांची आज चौकशी होणार असल्याने त्यांनी आज पुन्हा मनसैनिकांना आवाहन केले आहे. राज म्हणाले, "आपला सहकारी प्रवीण चौगुले याच्या निधनाच्या बातमीने माझे मन व्यथित झाले आहे. मला "ईडी'ची नोटीस आली, या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होते. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा. प्रवीणचे जसे माझ्यावर, पक्षावर प्रेम होते, तसेच तुम्हा सगळ्यांचे माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे याची मला जाणीव आहे. पण, माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, की कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. या आधीदेखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत, त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण या प्रसंगावरदेखील मात करू हे नक्की.'' 

"कालच्या माझ्या सूचनेनंतरदेखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असे मला कळले. तुमचे खरेच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही आणि काल मी जे सांगितले तेच पुन्हा सांगतो, तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. बाकी या विषयावर जे बोलायचे आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या,' असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT