Rain  esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain : घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; ताम्हिणी, शिरगावात २१० मिलिमीटर पाऊस

राज्यातही मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसी मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला असून, जिल्ह्यातील घाटमाथ्यावर सरीमागून सरी कोसळत आहे. शहरातही दिवसभर आकाश ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुढील आठवडाभर तरी शहरात पावसाची स्थिती ‘जैसे थे’ राहत घाटमाथ्यावर मुसळधार ते अती जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यातही मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वायव्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून राजस्थान, गुजरात, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वायव्य राजस्थानपासून हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल ते मणिपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्‍चिम कायम आहे. गुजरातपासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर मध्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

मॉन्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला असून, पुढील दोन दिवसांत संपूर्ण देशात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात मॉन्सून सक्रिय असल्याने रविवारी (ता. २) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) -

सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) -

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Transaction Fees : आता ATM मधून पैसे काढणं महागलं! SBI ग्राहकांच्या खिशाला कात्री; व्यवहाराआधी जाणून घ्या नवे शुल्क

Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग २९ मध्ये 'हाय व्होल्टेज' ड्रामा; बडगुजर की शहाणे, कोणाचा होणार राजकीय उदय?

Kolhapur City : सार्वजनिक वाहतूक सक्षम न झाल्यास कोल्हापूर आणखी मागे पडेल; वकिलांचा इशारा आणि ठोस मागण्या

Bigg Boss Marathi 6 : "माझ्यामुळे 50 मुलांना प्रवेश मिळाला" Viral व्हिडीओवर दिव्याचा खुलासा; नेटकरी म्हणाले..

Wani News : आदिमायेचे सुवर्णरूप! सप्तशृंगगडावर अनुभवा निसर्गाचा अद्वितीय सोहळा; सुवर्णकिरणांनी मूर्ती न्हाली

SCROLL FOR NEXT