high court
high court high court
महाराष्ट्र

'दिव्यांगांच्या लसीबाबत तातडीने काय पावले उचलता येतील?'

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: दिव्यांगांना घरीच लस देण्यासह आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी दाखल याचिकेत काय पावले उचलता येतील, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. आर. व्ही. घुगे यांनी दिले आहे. केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिव्यांगांना घरीच कोरोना लस देऊन त्यांच्या अडचणी कमी करण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे लातूर येथील सचिन चव्हाण यांनी केली आहे.

याचिकाकर्ते स्वतः दिव्यांग आहेत. दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी. दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ नुसार त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीत दिव्यांगांच्या हक्काचे संरक्षण करणे आणि त्यांना मदत करणे ही शासनाची जबाबदीर असते, असे म्हणणे याचिकाकर्त्याच्यावतीने मांडण्यात आले आहे. याचिकेवर झालेल्या सुनावणीत राज्य आणि केंद्र सरकारला खंडपीठाने नोटीस बजावली.

त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसाठी कोरोना लसी बाबत तातडीने काय पावले उचलता येतील व त्यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत करता येईल याचा खुलासा करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. प्रकरणात राज्य सरकारला एका आठवड्यात उत्तर दाखल करावे लागणार आहे. २३ जून रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होईल. अॅड. डॉ. स्वप्नील तावशिकर यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT