Mumbai High Court Sakal media
महाराष्ट्र बातम्या

'त्या' दोघांसाठी NEET परीक्षा पुन्हा घ्या - हायकोर्ट

ओमकार वाबळे

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा यावर्षी 12 सप्टेंबरला पार पडली. काही ठिकाणी या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. सोलापूरमध्येही असाच प्रकार समोर आला. हे प्रकरण थेट न्यायालयात गेलं आणि दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे.

सोलापुरातील नीट परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे घडलेल्या प्रकारात न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला. या दोन्ही उमेदवारांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे दोन उमेदवारांसाठी 'नीट' परीक्षा पुन्हा घ्या, असं कोर्टाने म्हटलंय.

वैष्णवी भोपळे आणि अभिषेक कापसे या दोन उमेदवारांनी रिट पिटिशन दाखल करून आपली कैफियत मांडली होती. यावर अंतिम सुनावणीवेळी न्यायमूर्ती रमेश धनुका व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने दोन्ही उमेदवारांच्या बाजूने निर्णय जाहीर केला. या दोन्ही उमेदवारांची 'नीट' परीक्षा पुन्हा घेऊन दोन आठवड्यांत निकाल जाहीर करावा, असे खंडपीठाने आदेशात जाहीर केले आहे.

याचिकाकर्त्या उमेदवारांना परीक्षेस पुन्हा बसू देण्याचा निर्णय प्रशासनाला घेता येणार नाही अशी भूमिक एनटीएने घेतली होती. प्रशासनाच्या चुकीमुळे या उमेदवारांचे नुकसान होऊ नये, असे निरीक्षण नोंदवत हा आदेश इतरांसाठी पायंडा म्हणून गृहित धरला जाऊ नये, असं स्पष्ट आदेश खंडपीठाने एनटीएला दिला आहे.

परीक्षा केंद्रावर प्रश्न आणि उत्तर पत्रिकांच्या संच वाटणीत गोंधळ झाल्याचं दोन्ही उमेदवारांनी पर्यवेक्षकांना सांगितलं. मात्र, त्याने दुर्लक्ष केलं. सोलापूर जिल्हाधिकारी व संबंधितांनाही ईमेलद्वारे तक्रार केली. अखेर शाळेने आपल्या चुकीची कबूली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT