hijab issue varsha gaikwad reaction on saffron shawls student heckled hijab wearing girl video  
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या बेटी बचाव घोषणेवर प्रश्नचिन्ह! वर्षा गायकवाड म्हणाल्या की..

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरुन राजकारण (Hijab Row) चांगलेच तापताना दिसत आहे. हिजाब घातलेल्या मुलींना शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारला जात आहे.हिंदू धर्मातील विद्यार्थी महाविद्यालयात भगवे दुप्पटे घेऊन येत आहेत. आज भगवे दुपट्टे घेतलेल्या हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी एका हिजाब घातलेल्या एकट्या मुली समोर घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ ट्विट करत मंत्री वर्षा गायकवाड यांनी खंत व्यक्त केली आहे.

हिजाब प्रकरणाबद्दल देशभरातून प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत, यादरम्यान जवळपास दिड मिनीटांचा हा व्हिडीओ शेअर करत वर्षा गायकवाड यांनी लिहिले आहे की, शैक्षणिक संस्थांमध्ये जे विष पसरवले जात असलेले पहाणे मन अस्वस्थ करणारे आहे. त्यांनी पुढे भाजपवर निशाणा साधत लिहिले की, एकीकडे भाजप सरकार हे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणते आणि दुसरीकडे मात्र शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना अशा प्रकारे धमकावले जाते. शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या या गदारोळाबद्ल त्यांना, 'या द्वेषातून आपण आपले भविष्य वाचवले पाहिजे' असे मत व्यक्त केले आहे.

नेमके काय झालं?

कर्नाटकमधील कॉलेजमधिल विद्यार्थिनी हिजाब घालून उडपीतील पीईएस महाविद्यलयात जात होती. यावेळी भगवे दुपट्टे घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी तिला घेराव घातला आणि ''जय श्री राम'' अशी घोषणाबाजी केलीय. कर्नाटकमध्ये मागच्या काही दिवसांपासून हिजाब घालण्यावरुन राजकारण तापले असून सर्व विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशातच महाविद्यालयात यावे, असा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील लोकांना शांतता आणि सलेखा राखण्याचे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी पुढील तीन दिवस सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यावये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT