Siddheshwar Yatra 
महाराष्ट्र बातम्या

सिद्धेश्‍वर यात्रेबाबत घेतला "हा' ऐतिहासिक निर्णय

प्रशांत देशपांडे

सोलापूर : श्री सिद्धेश्‍वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी लाखो भाविकांनी भावनांना आवर घालावे, असे आवाहन केले. त्या वेळी उपस्थित मानाच्या सातही नंदीध्वजांच्या मानकऱ्यांनी, नंदीध्वजधारकांनी, सिद्धेश्‍वर भक्तांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. श्री. हिरेहब्बू यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मागील वर्षी अक्षता सोहळा वेळेवर पार पडला. यात्रेच्या इतिहासात हे प्रथमच घडले. ऐतिहासिक निर्णयात नंदीध्वज आडवे न करता भाविकांकडून पूजा स्वीकारल्याने अक्षता सोहळ्यासह सर्व विधी वेळेत आटोपले.

हेही वाचा : निवडणूक आहे, पण मतदारच नाहीत
-
यात्रेतील महत्त्वाचा क्षण म्हणजे अक्षता सोहळा
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेतील महत्त्वाचा क्षण म्हणजे अक्षता सोहळा. तो दरवर्षी दुपारी 12.30 ते एकच्या दरम्यान पार पडत होता. दरम्यान, यात्रेच्या पहिल्या दिवशी 68 लिंगांची प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री सात ते आठच्या दरम्यान नंदीध्वज मानकऱ्यांच्या वाड्यात तर अक्षता सोहळ्या दिवशीही नंदीध्वज रात्री 10 पर्यंत वाड्यात येत होते. त्यानंतर मानकऱ्यांच्या घरी त्यांना जेवण असायचे. पहिल्या दिवशी 68 लिंग यात्रा संपायला रात्री 11 ते 12 वाजायचे.

पहिल्या नंदीध्वजाला खोबऱ्यांचा हार बांधण्याची परंपरा
अक्षताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात येऊ लागले. त्यामुळे मानकऱ्यांनी जेवणाच्या तारखा बदलल्या. तत्पूर्वी, उशीर होण्याचे कारण म्हणजे मानकरी व भक्तांकडून पहिल्या नंदीध्वजाला खोबऱ्यांचा हार बांधण्याची परंपरा होती. त्यामुळे दोन भाऊ व दोघांचा हार स्वतंत्र बांधायला सुरवात झाली. त्या दोघांच्या पुढील पिढीने आणखी हार बांधायला सुरू केले आणि त्यामुळे खोबरे, खारीक हारांची संख्या वाढली. त्यामुळे प्रत्येक वेळेला नंदीध्वज आडवे करून पूर्वीची खोबऱ्यांची माळ काढून नवीन खोबऱ्यांची माळ बांधून पूजा व्हायची. त्यानंतर नंदीध्वजांचे मंदिराकडे मार्गक्रमण व्हायचे. अशा पद्धतीने पूजा वाढत गेली आणि नंदीध्वज मिरवणुकीला विलंब होऊ लागला. भक्तांचे मन दुखावू नये म्हणून सुरू असलेल्या प्रथेमुळे हारांची संख्या वाढत गेली. परिणामी मिरवणूक संपायला खूप उशीर होऊ लागला.

मंदिर समिती व यात्रा कमिटीचे धाडसी निर्णय
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार रात्री 12 नंतर वाद्ये बंद झाली. त्यामुळे मध्यरात्री नंदीध्वज आलेलेही भक्तांना समजत नव्हते. नंदीध्वज येईपर्यंत त्यांना जागरण करावे लागत होते. दिवसेंदिवस अक्षता सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी जमू लागली. जागा मिळावी म्हणून भाविक सकाळी आठ, नऊ, दहा वाजता येऊन बसू लागले. त्यामुळे नंदीध्वजांची प्रतीक्षा करत अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. गर्दीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागत होते. या सर्व बाबींचा विचार करून 2 डिसेंबर 2018 रोजी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात विशेष बैठक पार पडली. त्यामध्ये यात्रा कमिटी अन्‌ मंदिर समितीने अनेक धाडसी निर्णय घेतले. तेव्हापासून यात्रा वेळेत पार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT