महाराष्ट्र बातम्या

कोरोना फोफावतोय! यंदाचे रंगही बेरंगच, होळीला ठाकरे सरकारची नवीन नियमावली?

सकाळन्यूजनेटवर्क

भारतामध्ये वर्षभरापासून तळ ठोकून असलेल्या कोरोना विषाणूची महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद आणि नागपुरसारख्या महत्वाच्या शहरांत लॉकाडाउन लावण्यात आला आहे. तर मुंबई-पुण्यासारख्या शहरात राज्य सरकार लॉकडाउन लावण्याच्या तयारीत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. देशातील  नवीन कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रायलायानेही चिंता व्यक्त केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून ठाकरे सरकारनं पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावले आहेत.  यासर्व बाबी पाहता यंदाच्या होळी-रंगपंचमीवेळीही ठाकरे सरकार निर्बंध लावण्याच्या तयारीत असल्याचं दिसतेय. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे यंदाची होळी-रंगपंचमी बेरंग होण्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोनाची वाढती संख्या पाहून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारने तर काही निर्बंध आत्ताच लावले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही असाच काहीसा निर्णय घेऊ शकतात. 

रंगाच्या उत्सवाला दोन आठवड्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. काही हौशी लोकांनी तर या उत्सवाची तयारीही सुरु केली असेल. पण सध्याची वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहाता होळी आणि रंगपंचमीला राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याची शक्यता आहे. महाराष्‍ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगढ, पंजाब, तामिळनाडू, हरियाणासारख्या राज्यांतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. या राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. इतके करुनही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास राज्यातील इतर शहरातही लॉकडाउन लावण्यात येऊ शकतो.  

गेल्या वर्षी २०२० मध्ये होळी-रंगपंचमीवेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तितकासा नव्हता. तरीही काळजी म्हणून राज्य सरकारनं नियमावली जारी केली होती. यामध्ये रंग लावणे किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यावर निर्बंध लावले होते. महत्वाचं म्हणजे, कुठल्याही साथीच्या रोगांच्या काळात, रंग न खेळणं, किंवा पुरेशी काळजी घेऊनच ती खेळणं योग्य ठरतं. कोरोना विषाणू किंवा इतर श्वसनाच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञ नाका तोंडाला हात न लावणं चांगलं असं सांगतात. त्यांच्या मते, साथीच्या काळात लोकांशी हात मिळवणंही टाळलेलं बरं. पण धुळवडीचे रंग खेळताना एकमेकांच्या हातानं तोंडाला रंग लावला जातो, जे टाळता येत नाही.

गतवर्षी कोरोनाचा तितकासा प्रादुर्भाव नव्हता. मात्र, यंदा दुसरी लाट आली असून कोरोना फोफावतो. त्यातच भर म्हणून दक्षिण आफ्रिका, युके येथील कोरोना व्हेरियंटही आढळत आहेत. त्यामुळे आपणच काळजी घेणं गरजेचं आहे. यंदाची परिस्थिती पाहता, होळी सणावेळी गर्दी करण्यावर नक्कीच निर्बंध लागू शकतात. बिहार सरकारनं तर याची घोषणाही केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारही होळी-रंगपचमीच्या सणाच्या आगोदर निर्बंधाची घोषणा करु शकतं.  
 
सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून याची भीती सगळ्यांच्याच मनात आहे. होळीच्या सणाच्या वेळी कोरोना विषाणू जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळी एकाच ठिकाणी अनेक लोक होळी खेळण्यासाठी येणार. अशावेळी हवेमार्फत बाधित व्यक्तीकडून इतरांपर्यंत हा संसर्ग पोहोचण्याची शक्यता असते. रंगपंचमी खेळण्यासाठी पाण्याचा वापर अतिप्रमाणात केला जातो. त्यामुळे विषाणूचं संक्रमणसुद्धा होऊ शकतं. होळीच्या सणाला तुमची लहानशी चुकसुद्धा इतरांच्या आणि स्वत:च्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही सणासुदीच्या काळात स्वत:ला काही निर्बंध लावून घ्या. सरकारच्या नियमावलीचाी वाट पाहत बसू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT