fight NCP and Shiv Sena for the post of Home Minister Uddhav Thackeray Dilip Walse Patil mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

सोमय्या पोलीस स्टेशनबाहेर पडण्याआधीच वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला

राज्यात नवनीत राणा, किरीट सोमय्या, राज ठाकरेंची सभा या सगळ्या घटनांमुळे गोंधळ सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या नवनीत राणा, किरीट सोमय्या, राज ठाकरेंची आगामी सभा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गोंधळ सुरू आहे. आज किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांनी तक्रार दिल्यास दोषींवर कारवाई होईल, असं आश्वासन वळसे पाटलांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर आता सोमय्या बाहेर येण्याआधीच वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.

या भेटीमध्ये राज्यात सध्या चालू असलेल्या गोंधळांबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवनीत राणा यांनी महाराष्ट्र पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत. आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही, शौचालयास जाऊ दिलं नाही असे आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दिली होती. लोकसभेच्या समितीने याची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारकडे २४ तासांतच अहवाल मागवला होता. या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी वळसे पाटील चर्चा करणार असल्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत नवनीत राणा यांच्या बाबतचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव लोकसभा सचिवांकडे पाठवणार आहेत.

राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता, त्यात ते जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर आपण पोलिसांत तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण मुंबई पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांनी आपली खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप करत ते आज खार पोलीस स्टेशन इथं पोहोचले आहेत. गेल्या दीड ते दोन तासांपासून ते पोलीस स्टेशनमध्येच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT