Dilip Walse Patil टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

भाजप नेत्यांनाच कसा दिलासा मिळतो? गृहमंत्री वळसेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ३७० कलम याविषयी १४ ट्विट करत टिका केली आहे. या पार्श्वभूमिवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीची ३७० कलम याविषयी भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले.

वळसे पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांचा संबंधी दाऊदशी जोडला जातो, ही काही नवीन बाब नाही. या आधी देखील असे प्रयत्न झाले आहेत. नवाब मलिकांची केस खूप जुनी केस आहे. दाऊदशी संबंध नसताना ओढून ताणून संबंध जोडायचा, शरद पवार यांचा संबंध नसताना देखील त्यांचा जोडण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता, त्यामुळे मला त्यात काही तथ्य दिसत नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याबाबत गृहमंत्री म्हणाले की, मुस्लिम आरक्षणाचं सोडा, शैक्षणीक आरक्षणाबाबत कोर्टाचा निर्णय असताना मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण नाकरलं

भारत हा वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र असलेला देश आहे, आजही भारत अखंड आहे आणि अखंडच राहील त्याचं विघटन करण्याचा प्रयत्न करु नये. असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.

भाजप नेत्यांनाच दिलासा कसा मिळतो?

भाजप नेत्यांनात न्यायालयात दिलासा कसा मिळतोय असे विचारले असता, तो एक आश्चर्याचाच प्रश्न असल्याचे गृहमंत्री म्हणाले. "एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना दिलासा मिळायला लागला बाकीच्या पक्षांच्या लोकांचा विचार..अशा केसेस समोर आहेत, त्याचा सहजपणे कोणाच्या मनात असा प्रश्न येईल, त्याच्यात काही चूकीचं नाही' असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

जेम्स लेन प्रकरणाबाबत शरद पवारांनी माफी मागावी या मनसेच्या मागणी बाबत गृहमंत्री म्हणाले की, मनसेला अशी अनेकदा माफी मागावी लागेल, शरद पवारांनी माफी मागण्याचा प्रश्न नाही असेही त्यांनी सांगितली.

तसेच हनुमान जयंतीच्या निमीत्ताने भाजपचे मोहीत कंभोज भोंगे वाटणार आहेत, या बाबतीत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना वळसे पाटील यांनी सांगीतले की, भोग्यांच्या बाबतीत ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो तो न्यायालयीन निर्णय असा आहे की, रात्री १० ते सकाळी ६ कोणीही लाऊडस्पिकर मोठ्याने लावू नयेत त्याचे डेसिबल ठरवून दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाने मंदिरावरचे किंवा मस्जिदीवरचे किंवा अन्य ठिकाणचे जे परवानगी घेऊन लावलेल्या भोंग्याविषयी न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नाही असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

Latest Live Updates Marathi : 'पॅलेट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं'; प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

पुण्यात खळबळ! विद्यापीठात बनावट डिग्रीचं रॅकेट? रिक्षाचालकाने उघड केलं गंभीर प्रकरण

SCROLL FOR NEXT