Sushma Andhare  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? सुषमा अंधारेंचा सोमय्यांना सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढताना दिसून येत आहेत

सकाळ डिजिटल टीम

एकीकडे राज्यात अनेक मुद्यावरून राजकारण सुरू असतानाच दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढताना दिसून येत आहेत. किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षात नवीन लोकांचे घोटाळे बाहेर काढू असं आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन सांगितलं होतं. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरतीही गंभीर आरोप केले आहेत.

कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले होते. मात्र, आता हे बंगले आता गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याच गोष्टींवरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.

यासंबधी बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असते. ते फार आरंभशूर आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचे काहीच होत नाही. राहिला प्रश्न त्या 19 बंगल्याचा, जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे असं अंधारे म्हणाल्या आहेत.

सह्याद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीटभाऊंनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी, असा खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT