china video esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : वाहत्या पाण्यात अडकल्यानंतर स्वतःचा जीव कसा वाचवायचा? IMD प्रमुखांनी शेअर केली ट्रिक, चीनमधल्या ट्रेनिंगचा व्हिडीओ पाहा...

Video Viral : अचानक पाण्याचा प्रवाह आला तर अडकलेल्या लोकांनी पाण्याचा आडवं उभं राहण्यापेक्षा एकापाठी एक उभं राहावं, एकमेकंना घट्ट पकडून अशा पद्धतीने उभं राहिल्यास पाण्याच्या प्रवाहाला विरोध होत नाही. चीनमध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा हा भाग असल्याचं होसाळीकर यांनी सांगितलं.

संतोष कानडे

IMD News : पावसाळा सुरु झाली की वर्षा पर्यटनासाठी पर्यटक पाण्याच्या ठिकाणी गर्दी करतात. परंतु वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाण्याच्या घटना घडत असतात. नुकतंच भूशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

अशा घटना घडत असताना नेमकी काय खबरदारी घ्यावी, यासंबंधीचा एक व्हिडीओ पुणे आयएमडी प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाण्यापासून बचाव करण्याची ट्रिक सांगितली आहे.

अचानक पाण्याचा प्रवाह आला तर अडकलेल्या लोकांनी पाण्याचा आडवं उभं राहण्यापेक्षा एकापाठी एक उभं राहावं, एकमेकंना घट्ट पकडून अशा पद्धतीने उभं राहिल्यास पाण्याच्या प्रवाहाला विरोध होत नाही. चीनमध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा हा भाग असल्याचं होसाळीकर यांनी सांगितलं.

होसाळीकर यांचं ट्वीट

जर वाहत्या पाण्यात समूहाणे अडकलो तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवू शकतो. हे china मध्ये दिलेले training प्रशिक्षण व्हिडिओ पहा आणि फॉरवर्ड करा जेणेकरून कुणाला तरी उपयोगी येईल.

एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले

लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये ४ लहान मुले आणि १ महिला यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील रहिवाशी होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल, जो रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो, तिथे हे अन्सारी कुटुंब वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. ३० जून रोजी पाय घसरुन हे सर्वजण वाहून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT