Tiger1
Tiger1 Sakal
महाराष्ट्र

मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला; तीन वर्षांत प्राण्यांचे २११ बळी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील मानव -वन्यजीव संघर्ष टोकाला पोचलेला आहे. वन्यप्राण्यांचे वास्तव्यक्षेत्र मर्यादित झाल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात २११ जणांचे बळी गेले आहेत. २०२१ या वर्षात सर्वाधिक ८४ बळी गेले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जखमी झालेल्यांची संख्या २० टक्के आहे. (Maharashtra Wild Animal death)

पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढत असताना विदर्भात वाघ-बिबटे व अन्य वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गावकरी दहशतीखाली वावरताना दिसतात. चालू वर्षात आतापर्यंत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, अस्वल, बिबट्याच्या हल्ल्यात सर्वाधिक बळी गेले आहे. शेतजमिनीचा विस्तार, विकास कामे, रस्ते रुंदीकरण, उद्योगांसाठी जमीन अधिग्रहण केल्याने जंगल क्षेत्र कमी झालेले आहेत.

नागरी जीवन आणि पायाभूत सुविधांचा विकास करीत असताना वाघांसह वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा मुद्दा विचारात घेतला गेला नाही. त्यामुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढू लागले आहेत. याशिवाय वाघांची संख्याही वाढू लागलेली आहे. वन्यजीव प्रेमींसाठी सुखद धक्का देणारी असताना तेथील रहिवाशांचे जीवन धोक्यात आले आहे.

हल्ल्यात सातत्याने वाढ

वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यजीवांच्याही हल्ल्याच्या धक्कादायक घटना अलीकडे घडल्या आहेत. राज्यात गेल्या तीन वर्षांममध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. यात सर्वाधिक ८४ बळी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत झालेले आहे. २०२०-२१ या वर्षांत ८० जणांचे बळी गेले होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानीपोटी २०१९ ते जानेवारी २०२२ या कालावधीत २०९ कोटी ३६ लाख रुपयांचे साहाय्यही वनविभागाने दिले आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत ८७९ जण जखमी झाले आहेत, असे माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारलेल्या माहिती अधिकारातून पुढे आले आहे.

७० वन्यप्राण्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या तीन वर्षांत ७० वन्यजीवांचा संघर्षात मृत्यू झाला आहे. त्यात १३ वाघ, ४० बिबट्यांचा समावेश आहे. याशिवाय रानगवा, काळवीट, अस्वलांचाही मृत्यू झुंजीत झाल्याची माहिती समोर आली आहे. २०२१-२२ या वर्षात सर्वाधिक सहा वाघ झुंजीत मरण पावलेले आहेत. याच वर्षात सर्वाधिक २८ वन्यप्राणी संघर्षात मरण पावलेले आहेत.

दोन कर्मचारी दगावले

वनसंवर्धन करताना वन्यजीवांनी केलेल्या हल्ल्यात दोन वन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील स्वाती ढुमणे आणि राहुरी वन परिक्षेत्रातील वनमजूर लक्ष्मण किनकर यांचा समवेश आहे.

दोन वर्षांतील मृत्यू (मानव)

८४

२०२१

८०

२०२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT