महाराष्ट्र बातम्या

'नवरा हवा की मटण?' यापैकी एक निवड, बायकोला चक्क नवऱ्याचा इशारा

या गमतीदार वादावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

या गमतीदार वादावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नवरा-बोयकोतील भांडण म्हणजे कभी कट्टी, कभी बट्टी असे असतेच. कधी टाकाचे वाद तरी कधी काही शुल्लक कारण यामागे असते. काही दिवसांपूर्वी बंगळुरुमधील एक घटनाही समोर आली होती, यात लॅपटॉप धुणाऱ्या पत्नीकडून पतीनं घटस्फोट मागितला होता. आताही अशीच एक घटना पुन्हा सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. हा वाद आहे नवरा बायकोतील. मात्र या गमतीदार वादावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पती पत्नीच्या मटण खाण्याच्या सवयीमुळे पुरता त्रासला आहे. इतकंच नाही तर पतीनं पतीचं मटण सोडवण्यासाठी चक्क कॉलमनिस्टकडेच सल्ला मागितला आहे.

दरम्यान, आता सोशल मिडीयावर यासंबधित मजेदार कमेंट सुरु झाल्या आहेत. मटणावरून शाकाहारी पती आणि मांसाहारी पत्नी यांच्यात वाद झाला आहे. पत्नीनं मटण सोडण्यास नकार दिल्यानं पती कोंडीत सापडला आहे. पतीनं कॉलमनिस्टकडे आपल्या मांसाहारी पत्नीबाबत सल्ला मागितला आहे. याचं ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.

याबाबत सांगताना शाकाहारी माणसाने कॉलममध्ये लिहीलं की, “आपण लग्न केलं तेव्हा पत्नी शाकाहारी असल्याचं वाटलं होतं. कारण तिचं संपूर्ण कुटुंब शाकाहारी आहे. नंतर पत्नीनं आपल्याला मटण खायला आवडतं असं सांगितलं. लग्नानंतर मटण खाणं सोडून देईल असं वचन पत्नीनं दिलं होतं. ती सुंदर असल्यानं या अटीवर मी तिच्याशी लग्न करण्यास तयार झालो. मात्र अजूनही ती लपूनछपून मटण खाते. तिने वचन पूर्ण केलं नसून मटण खाण्याची सवय सोडलेली नाही. आता ती सांगते की, मटण खायला आवडतं आणि त्याशिवाय राहू शकत नाही. मी तिला पुन्हा एकदा माफ करण्यास तयार आहे. मी पत्नीला इशारा दिला आहे, 'नवरा हवा की मटण?' यापैकी एक निवड. मला भिती आहे की, ती मटण निवडेल ? तुम्हांला काय वाटतं?' असा प्रश्न त्या पतीने विचारला आहे. पतीच्या या तक्रारीनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर मटणाशिवाय राहणं अशक्य असल्याचंही लिहीलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT