Uddhav Thckeray 
महाराष्ट्र बातम्या

'महापालिका तुम्हाला हवी असेल तर आम्ही धुणीभांडी करू का?'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काही महत्त्वाची विधाने केली आहेत. त्यांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली आहे. त्यांनी म्हटलंय की, भाजपने हिंदुत्वाचा वापर सत्तेसाठी केला. त्यांनी असाही सवाल केलाय की, देश, राज्य आणि महापालिका हे सगळंच तुम्हाला हवी असेल तर आम्ही काय भांडी घासायची? आम्ही काय धुणीभांडी करायची का?

'बाळासाहेबांसारखं मला बोलता येत नाही'

लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे त्यांनी म्हटलंय की, मी माझा अनुभव सांगतो, आमच्यावर कुणी राजकारण लादलं नाही. जन्मापासून वारं भिनतात, तू माझा मुलगा आहेस म्हणून मी जनतेवर आणि शिवसेनेवर लादणार नाही. जर जनतेने तुला स्विकारलं तर तुझं तू पुढे जाशील. तो त्याच्या मार्गाने पुढे जातोय. शिवसेनेचा आवाज पिढीप्रमाणे बदलेल. जनतेची समावसेवा करणारी आमची सहावी पीढी आहे. आमचे पूर्वज झोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते. अजूनही मला मी भाषण करतो असं वाटत नाही. मला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही म्हणून टीका झालीये, असंही त्यांनी म्हटलंय.

'शिवसेना नॅशनल वार्मिंग करते'

पुढे त्यांनी म्हटलंय की, शिवसैनिक मुळात गरम रक्ताचाच आहे. शिवसेना ग्लोबल नाही तर नॅशल वार्मिंग करतेच.केंद्रीय यंत्रणांमार्फत कारवाईचा थेट संबंध आहे का? तर हो. इतर राज्यात बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर ठिकाणी यंत्रणाच नाीहये का? गुजरातमध्ये इतके ड्रग्ज सापडले, आपल्याकडे चिमुटभर सापडली तरी किती गजहब... महाराष्ट्रात भयावह असल्याचं चित्र निर्माण करुन बदनाम करण्याचे षड्यंत्र केलं जातंय. जणू काही महाराष्ट्र सडका भाग असल्याचं राजकारण सुरु आहे. धाडीमागू धाडी सुरु आहेत. ठिक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. संधी ही प्रत्येकाला चालून येत असते. एवढ्या वर्षानंतर देशाची सत्ता मिळाली. संधीचं सोनं करायचं सोडून माती करणार असाल तर बरोबर नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेनेचे प्रेमी आहेत. सत्ता मिळवा पण लोकशाही मार्गाने मिळवा, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT