Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात निर्बंध कडक होण्याची शक्यता; अजित पवार यांचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्रॉनची तीव्रता सौम्य असली तरी खबरदारी घ्यायची गरज असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या दिल्लीनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. याशिवाय आता थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही निर्बंध आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील निर्बंध आणखी कडक होण्याचे संकेत दिले आहेत. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत. अजित पवार पुण्यात जिल्हा बँकेच्या प्रचार मेळाव्यानंतर बोलताना कोरोनाचा धोका वाढल्यास निर्बंध लावावेच लागतील असं ते म्हणाले.

अजित पवार यांनी सांगितलं की, ओमिक्रॉनची तीव्रता सौम्य असली तरी खबरदारी घ्यायची गरज आहे. सभागृहातही पोटतिडकीने सांगतो की मास्क लावा. तरीही कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाला बोलावलं जातं. शिवाय जे लोक नियम पाळत नाहीत त्यांनाही सांगतो की, आता वर्ष संपतंय, कोरोना वाढतोय. त्यानिमित्त होणाऱ्या पार्ट्या या वेगळ्या स्वरुपाच्या असतात. लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आल्यानं संसर्ग होतोय. यावेळी होणारा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं.

राजकीय नेत्यांकडून कार्यक्रमात गर्दी होते का याबद्दल विचारंल असता ते म्हणाले की, राजकीय नेते गर्दी करतात असं नाही. कार्यकर्त्यांकडून निमंत्रण दिलं जातं. ते एकदा तरी येऊन जा असं म्हटलं जातं. कार्यकर्ते म्हणतात आम्ही गर्दी करत नाही पण प्रत्यक्षात वेगळंच चित्र असतं. एकदा, दोनदा झालं की तिसऱ्या वेळी आम्ही बंधनं घालून घेतली तर पुन्हा हेच घरात बसले अशी बातमी येते. कोरोनाच्या बाबतीत असणारे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत अशी भूमिका आम्ही सर्वांना सांगायला हवी आणि आम्हीही त्याचे पालन केले पाहिजे असं सांगत नेत्यांनीही खबरदारी घ्यावी असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT