डोळ्यांपासून किती दूर धरावा मोबाईल Esakal
महाराष्ट्र बातम्या

पालकांनी 'ही' चतु:सूत्री पाळल्यास मुले पुन्हा घेणार नाही हातात मोबाईल! चिमुकल्यांचा कमी करा मोबाईलचा नाद; अभ्यासाची निर्माण होईल गोडी

आजकालची मुले मोबाईलशिवाय जेवण करत नाहीत. मोबाईल हिसकावून घेतला तर ते रडतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे चिमुकली शारीरिक हालचालींपासून दूर गेली आहेत. मोबाईलच्या व्यसनामुळे अनेकांमध्य लठ्ठपणा वाढला असून अनेकांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : आजकालची मुले मोबाईलशिवाय जेवण करत नाहीत. मोबाईल हिसकावून घेतला तर ते रडतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे चिमुकली शारीरिक हालचालींपासून दूर गेली आहेत. मोबाईलच्या व्यसनामुळे अनेकांमध्य लठ्ठपणा वाढला असून अनेकांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागला आहे. चिडचिडेपणा, चिंता, ताण अशाही समस्या त्यांच्यात दिसतात. अनेकदा पालक मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी फटकारतात, मारतात, पण त्यांना ऐतिहासिक गोष्टी सांगून, पुस्तक वाचनाची आवड निर्माण करताना त्यांच्यासोबत पालकांनी खेळणे हा उत्तम पर्याय आहे.

मुलांच्या मागण्या पूर्ण झाल्यावर ते हट्टी होतात, त्यांना माहीत असते, आग्रह धरला तर मागण्या पूर्ण होतील. त्यामुळेच जेव्हा ते मोबाईल मागतात, तेव्हा त्यांना तो दिला जातो. त्यामुळे मोबाईल वापरणे त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग बनते. हळूहळू ही सवय बनते आणि त्याचे व्यसन लागते. बालपणातच आजारांना ते बळी पडत आहेत. मोबाईलवर दिसणाऱ्या काही गोष्टींचा त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर करता येते, पण त्यासाठी वेळकाढूपणा नको, असे वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात. पालकांनी त्यांच्यसमोर मोबाईलचा वापर कमी करावा. मुले लहान असतात तेव्हा ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करून काही गोष्टींचे अनुकरण करायला शिकतात.

मोबाईलपासून दूर करण्यासाठी चतु:सूत्री

  • १) मुलांना गोडीने समजावून सांगा

  • मुलास लागलेली मोबाईलची सवय सोडायची असेल, तर त्यांच्यासोबत प्रेमाने वागा, त्यांना समजावून सांगा. फोन वापरणे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते, यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक परिणामांना तोंड द्यावे लागू शकते. जर एखाद्या लहान मुलाला मारहाण करून काही करण्यापासून रोखले तर तो हट्टी होतो. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करतो.

  • ----------------------------------------------------------------------------------

  • २) पालकांनी मुलांसोबत खेळावे

  • मुले आग्रह धरतात तेव्हा त्यांना मोबाईल देण्याऐवजी, पालकांनी त्यांच्यासोबत खेळले पाहिजे. त्यांना नवीन सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे. चित्रकला, संगीत, नृत्य, योग, खेळ अशा खेळांमधून त्यांना शारीरिक व्यायामाची सवय लावावी. जेणेकरून तो मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होईल. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील हा सर्वोत्तम पर्याय आहे.

  • --------------------------------------------------------------------------------------

  • ३) मुलांसाठी बनवा दिवसभराचे वेळापत्रक

  • चिमुकली मुले दिवसभरात जे काही करतील (जागे झाल्यापासून झोपेपर्यंत) त्यासाठी वेळ निश्चित करा. यामुळे मुलाला संपूर्ण दिवस कसा वापरायचा हे कळेल. या वेळापत्रकात, त्यांच्या झोपण्याच्या, खाण्याच्या, खेळण्याच्या आणि अभ्यासाच्या वेळा निश्चित कराव्यात. त्यानंतर त्यांना मोबाईलची सवय लागली असेल तर दिवसातून फक्त २० ते ३० मिनिटे मोबाईल दाखवा, तेही त्यांच्या अभ्यासाशी संबंधित गोष्टी, शब्द-अंक ओळख होईल असे व्हिडिओ दाखवावेत.

  • ------------------------------------------------------------------------------------------------

  • ४) मुलांजवळ फोन ठेवू नका

  • पालकांनी मुलांजवळ फोन ठेवू नये. त्यांचा फोन वापरण्याचा मोह कमी व्हावा म्हणून पालकांनी फोन त्यांच्या नजरेपासून दूर ठेवावा. रात्रीच्या वेळी फोन मुलांजवळ ठेवू नये. पालकांनीही त्यावेळी मोबाईलचा वापर टाळावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT